Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Landmark Cars IPO Listing: लॅंडमार्क कार्सच्या आयपीओने केली गुंतवणूकदारांची निराशा, डिस्काउंट रेटवर झाला लिस्ट

landmark cars listing

Landmark Cars IPO Listing: शेअर मार्केटमधील पडझडीचा आज शुक्रवारी लॅंडमार्क कार्सच्या लिस्टिंगला फटका बसला. आज लॅंडमार्क कार्सचा शेअर आयपीओमधील किंमतीच्या तुलनेत 7% सवलतीमध्ये सूचीबद्ध झाला.

शेअर मार्केटमधील पडझडीचा आज शुक्रवारी लॅंडमार्क कार्सच्या लिस्टिंगला फटका बसला. आज लॅंडमार्क कार्सचा शेअर आयपीओमधील किंमतीच्या तुलनेत 7% सवलतीमध्ये सूचीबद्ध झाला. आयपीओमध्ये शेअर प्राप्त झालेल्या गुंतवणूकदारांची निराशा झाली.(Landmark Cars got listed at Rs 471.30 on BSE, a discount of 7% against its issue price of Rs 506 apiece)

लॅंडमार्क कार्सचा शेअर आज बीएसईवर 471.30 रुपयांवर सूचीबद्ध  झाला. तो IPO च्या तुलनेत 7% सवलतीत लिस्ट झाला. कंपनीने आयपीओवेळी प्रती शेअर 506 रुपयांचा दर निश्चित केला होता. राष्ट्रीय शेअर बाजारात लॅंडमार्क कार्सच्या शेअरची 471 रुपयांना नोंदणी झाली.

लॅंडमार्क कार्सने आयपीओतून 552 कोटींचे भांडवल उभारले आहे मात्र पहिल्याच दिवशी कंपनीने गुंतवणूकदारांची घोर निराशा केली. बाजारात आज चौफेर विक्री सुरु होती. या पडझडीच्या वादळात लॅंडमार्क कार्सच्या शेअरला देखील झळ बसली. लिस्टिंगपूर्वी ग्रे मार्केटमध्ये लॅंडमार्क कार्सचा शेअर 15 ते 20 रुपये प्रिमीयमवर ट्रेड करत होता. आयपीओ तीन पटीने सबस्क्राईब झाला होता. आयपीओसाठी 481 ते 506 रुपयांचा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे चांगली लिस्टिंग होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

आज सकाळी बाजार सुरु होताना लॅंडमार्क कार्सच्या शेअरचे घंटानाद करुन लिस्टिंग झाले. लॅंडमार्क कार्स लिमिटेडचे ग्रुप चेअरमन संजय ठक्कर, चीफ ट्रेडिंग ऑपरेशन गिरीश जोशी यांच्या उपस्थित लिस्टिंग सोहळा पार पडला. बीएसईवर लॅंडमार्क कार्सचा शेअर 471.30 रुपयांवर खुला झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात तो 471 रुपयांवर सूचीबद्ध झाला. दोन्ही बाजारात तो आयपीओ प्राईसच्या तुलनेत 7% डिस्काउंटने लिस्ट झाल्याने गुंतवणूकदारांची निराशा झाली.

लॅंडमार्क कार्स ही भारतातल्या प्रमुख ऑटो डिलर्सपैकी एक कंपनी आहे. कंपनी 1998 पासून कार विक्रीमध्ये आहे. कंपनीकडून मर्सिडिज बेंझ, होंडा, जीप, फोक्सवॅगन, रेनॉ या कंपन्यांच्या कार्सची विक्री केली जाते. त्याचबरोबर अशोक लेलॅंड कंपनीच्या कमर्शिअल वाहनांची देखील कंपनी विक्री करते.