Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

दिव्यांगांसाठी ठरेल वरदान; 'कलआर्म' हा देशातील पहिला स्वयंचलित हात

Automatic Arm

Image Source : www.openbionicslabs.com

Automatic Arm: माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना समर्पित केलेला हा ‘कलआर्म’ देशातील पहिला ‘बायोनिक हॅंड’ ठरला असून हैद्राबादमधील एका कंपनीने याला विकसित केले आहे.

Automatic Arm: बऱ्याच वेळा मोठ्या अपघातांमध्ये हात गमाविल्यानंतर किंवा जन्मत:च हात नसलेल्यांना आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता तंत्रज्ञान(Technology) आणि वैद्यकीय(Medical) क्षेत्रातील प्रगतीमुळे यावर देखील मात करणे शक्य झाले आहे. सर्व प्रकारच्या क्रिया करू शकणारा स्वयंचलित हात(Automatic Arm) विकसित करण्यात आला असून मोबाईल ॲपच्या(Mobile App) माध्यमातून याला संचालित करता येणे शक्य होणार आहे. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम(Dr. A.P.J. Abdul Kalam) यांना समर्पित केलेला हा ‘कलआर्म’ देशातील पहिला ‘बायोनिक हॅंड’ ठरला आहे.

मोबाईल ॲपच्या माध्यमातून संचालित करता येणार

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम(Dr. A.P.J. Abdul Kalam) यांना समर्पित केलेला हा ‘कलआर्म’ देशातील पहिला ‘बायोनिक हॅंड(Bionic hand)’ ठरला आहे. हैदराबाद येथील एका कंपनीने या स्वयंचलित हाताला विकसित केले आहे. वजनाने अतिशय हलका असलेल्या या ‘बायोनिक हॅंड’मध्ये 18 प्रकारच्या ग्रिप्स देण्यात आल्या आहेत. याचा उपयोग करून 8 किलोपर्यंतचे वजन सहजपणे उचलता येणे शक्य होणार आहे. हा हात बॅटरीच्या माध्यमातून चार्ज करता येतो. एकदा चार्ज केले की सहजपणे 8 ते 10 तास याचा वापर करता येतो. विशेष म्हणजे याला मोबाईल ॲपच्या माध्यमातून सुद्धा संचालित करता येते. ब्लुटूथच्या माध्यमातून याला कनेक्ट केल्यानंतर यामधील विविध कंट्रोल देखील सहज वापरता येतात. यासोबतच यामध्ये ऑनलाईन अपडेट्स देखील देण्यात आले आहेत, अशी माहिती संबंधित कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक विजय बगाडे यांनी सांगितली आहे.

दिव्यांगांसाठी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मदत

विदेशात हे तंत्रज्ञान अतिशय महागडे असून भारतात ते परवडणारे नाही. मात्र 10 ते 20 टक्के दरात हा हात भारतात विकसित करण्यात आला असून अनेक दिव्यांगांना याचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे शासकीय योजनेमधून गरजूंना याचे वाटप व्हावे यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मदत करण्याचे प्रयत्नही सुरू करण्यात आले  आहेत.

इलेक्ट्रोमायोग्राफी सेंसर प्रणालीचा वापर

हा ‘बायोनिक हॅंड(Bionic hand)’ इलेक्ट्रोमायोग्राफी सेंसर प्रणालीवर काम करतो. यातील सेंसर्स स्नायूंना हलवल्यावर निर्माण होणारे लहान विद्युत सिग्नल मोजत असतो. जेव्हा एखादा सरासरी माणूस आपले हात हलवण्याचा विचार करतो तेव्हा मेंदूतील मोटर न्यूरॉन्स हात आणि हाताच्या स्नायूंना संदेश पोहोचव असतात. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून हा हात काम करतो.