ग्रामीण व अर्ध-शहरी ग्राहकांच्या रोख-आधारित बँकिंग गरजांची पूर्तता करण्यासाठी कोटक महिंद्रा बँकेने संकल्प बचत खात्याची घोषणा केली. संकल्प बचत खात्यामुळे ग्राहकांना रोख डिपॉझिटवर शून्य शुल्क, वार्षिक 24 लाख रुपये काढण्याची सुविधा आणि प्रति तिमाही 2500 रुपयांची किमान शिल्लक राखण्याची सुविधा आहे. संकल्प खातेधारांना सोने, दुचाकी व ट्रॅक्टरवर विशेष दरांमध्ये कर्ज मिळेल, असा दावा बँकेने केला आहे.
संकल्प बचत खाते उदयोन्मुख ग्राहक समूहाला कृषीमधून, तसेच कृषीपलीकडील उत्पन्न प्राप्त करून देण्याच्या दृष्टीकोनासह लाँच करण्यात आले आहे. बँकिंग सेवा देण्याव्यतिरिक्त नवीन बचत खाते ग्रामीण व अर्ध-शहरी ग्राहकांच्या सर्वसमावेशक बँकिंग गरजांसाठी कॉम्प्लीमेण्टरी टॉक टाइम व पेशॉपमोअर डेबिट कार्ड देखील देते.
संकल्प बचत खाते, 'एक विश्वास आगे बढते रहने का' कोटक महिंद्रा बँकचा भारतातील ग्रामीण व अर्ध-शहरी ग्राहकांना सोयिस्कर किफायतशीर बँकिंग सोल्यूशन प्रदान करते. कोटक महिंद्रा बँकेच्या वेबसाईट किंवा मोबाइल अॅपच्या माध्यमातून खाते सुरु करण्याचा पर्याय आहे. यामधून सर्व ग्राहकांना सुलभ उपलब्धतेची खात्री मिळते.
कोटक महिंद्रा बँकेच्या वितरण, रिटेल दायित्वाचे अध्यक्ष व प्रमुख पुनीत कपूर म्हणाले, ''इंटरेनटचा वाढता वापर आणि नॉन-मेट्रो शहरांमधील उत्पन्नाच्या मार्गांमधील बदल यासह ग्राहक वैविध्यपूर्ण बँकिंग सेवांचा शोध घेत आहेत, जे रोख-आधारित असण्यासोबत अधिक पैसे काढण्याची मर्यादा व सुलभ कर्ज अशा त्यांच्या बँकिंग गरजांची पूर्तता करतील. संकल्प बचत खाते सोईस्कर बँकिंग सुविधा देण्यासह आकर्षक मूल्यवर्धित सेवा देते, जे विशेषत: या ग्राहक समूहासाठी क्यूरेट करण्यात आले आहेत.''
संकल्प बचत खात्याची वैशिष्ट्ये:
- मासिक शिल्लक 2500 किंवा किमान 365 दिवसांसाठी 25000 मुदत ठेव असलेल्या ग्राहकांसाठी 250 रुपयांचा एक-वेळ फायदा.
- गोल्ड लोन आणि दुचाकी व ट्रक्टर कर्जावरील प्रक्रिया शुल्कामध्ये अनुक्रमे 100% किंवा 50% सूट.
- पेशॉपमोअर डेबिट कार्डसह स्थानिक एटीएममध्ये दररोज 40000 रुपये काढण्याची मर्यादा.
- याच ग्राहकांना दररोज 2 लाख रूपयांपर्यंत खरेदी करण्याची मर्यादा;
- जवळपास 5 लाख रूपयांपर्यंत प्रोत्साहनपर वैयक्तिक अपघातीय मृत्यू संरक्षणासाठी पेशॉपमोअर डेबिट कार्ड.
- लॉस्ट कार्ड लायबिलिटी; जवळपास 250000 रूपयांपर्यंत आणि डायनिंग, शॉपिंग व प्रवासाददरम्यान दररोज स्पेशल ऑफर्स.