खाद्यपदार्थ निर्मितीत आघाडीवर असलेल्या कोहिनूर फुड्सच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झालेली पाहायला मिळाली. कोहिनूर फूड्सच्या या शेअरला अप्पर सर्किट लावावे लागले. गेल्या महिन्यात एप्रिलमध्ये या शेअर्सची किंमत 7.77 रूपये होती. ती 167 टक्क्यांनी वाढून आज 13 मे रोजी 23.80 रूपयांवर पोहोचला आहे. हा स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहचला आहे.
कोहिनूर फूड्सच्या स्टॉकला मंगळवारी अपर सर्किट लागले होते. हा स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. कोहिनूर फूड्सचा स्टॉक गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये 20.76 टक्क्यांनी वाढला. या स्टॉक्समध्ये एप्रिल महिन्यात 1 लाख लाख रुपये गुंतवले असते तर, त्याच्यात आज दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली असती.
कोहिनूर खाद्यपदार्थ उत्पादनात अग्रगण्य
कोहिनूस फूड्स खाद्यपदार्थ उत्पादनातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीचे बासमती तांदळाचे अनेक ब्रॅण्ड लोकप्रिय आहेत. तांदळाव्यतिरिक्त, कंपनी रेडीमेड करी, रेडीमेड ग्रेव्ही, कुकिंग पेस्ट, चटण्या, मसाले, फ्रोझन ब्रेड, स्नॅक्स आणि खाद्यतेल ही विकते. कोहिनूर कंपनी काही दिवसांपूर्वीच अदानी विल्मरने विकत घेतली आहे.
शेअर्सच्या किमती का वाढत आहे?
अदानी विल्मर लिमिटेड (AWL) कंपनीने अलीकडेच मॅककॉर्मिक स्वित्झलॅण्ड जीएमबीएच (mccormick switzerland gmbh) कडून कोहिनूर ब्रँडसह अनेक ब्रँड विकत घेण्याची घोषणा केली होती. यामुळे अदानी विल्मरला भारतातील कोहिनूर बासमती तांदूळ ब्रँड आणि कोहिनूर ब्रँड अंतर्गत त्याच्या रेडी-टू-कुक, रेडी-टू-इट, करी आणि फूड पोर्टफोलिओचे विशेष अधिकार मिळतील, असे कंपनीने एका निवेदनाद्वारे म्हटले होते. कोहिनूर ब्रँड एफएमसीजी कॅटेगरीमध्ये (FMCG Category) अदानी विल्मर कंपनीचे स्थान मजबूत करण्यास मदत होईल. तसेच यामुळे अदानी विल्मर कंपनीला तांदूळ आणि इतर खाद्यपदार्थांच्या व्यवसायांमध्ये आणखी उत्पादने आणण्यास मदत होईल.