Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Highest Paying Jobs: चांगलं पॅकेज मिळवून देणारे जॉब कोणते? तुमच्या करिअरला द्या नवी दिशा

top paying jobs

Image Source : www.trendscareers.com

करिअरमध्ये प्रत्येकालाच प्रगती करायची असते. सगळ्यांना चांगल्या पगाराची अपेक्षा असते. मात्र, करिअरची सुरुवात करताना योग्य कोर्स, पदवीची निवड करणंही तितकंच महत्त्वाचं असते. या लेखात पाहूया असे कोणते जॉब आहेत जे तुम्हाला चांगलं पॅकेज मिळवून देतील.

Top Paying Jobs: जॉब मार्केटमध्ये नवनवीन ट्रेंड येत असतात. ऐकेकाळी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला सर्वाधिक डिमांड होती. आता सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची चलती आहे. 

सध्या अॅडमिशनचा हंगाम सुरू आहे. प्रमुख शहरांतील आघाडीच्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअर्सला अॅडमिशन सहजासहजी मिळत नाहीये. मार्केटमधील बदल ओळखून करिअरचा निर्णय घ्यायला हवा. असे कोणते जॉब आहेत त्यांना भविष्यात डिमांड असेल आणि चांगला पैसाही मिळवून देतील, ते पाहूया. 

डेटा सायन्टिस्ट 

डिजिटायझेशनमुळे दरदिवशी मोठ्या प्रमाणात कच्ची माहिती (रॉ डेटा) निर्माण होते. फेसबुक, ट्विटर सारखी सोशल मीडिया ते विविध वेबसाइट, अॅप्सशी नागरिकांचा संबंध येतो. ग्राहक याद्वारे विविध सेवांचा फायदा घेतात. या कच्च्या डेटावर प्रक्रिया करण्यासाठी डेटा सायन्टिस्टची गरज लागते. व्यवसाय वाढीसाठी प्रक्रिया केलेल्या माहितीतून अंदाज बांधले जातात.

5 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणाऱ्या डेटा साइन्टिस्टला 50 लाखांपेक्षा जास्त वार्षिक पॅकेज मिळू शकते. 1 ते 2 वर्षांचा अनुभव असेल तरीही 5 लाखांपेक्षा जास्त पॅकेज मिळू शकते. डेटा सायन्स शिकण्यासाठी बाजारात अनेक कोर्सेस आणि पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. 

मशिन लर्निंग एक्सपर्ट 

मिशिन लर्निंग ही कॉम्प्युटर सायन्स क्षेत्रातील उभरते करियर आहे. रोबोटिक, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्जवर आधारित सेवा आणि उत्पादने तयार करताना मशिन लर्निंग इंजिनिअर्सची गरज लागते. फ्रेशर्सलाही 6 लाखांचे पॅकेज मिळू शकते. तसेच अनुभवानंतर 20 लाख किंवा त्यापेक्षाही जास्त पॅकेज मिळू शकते.

पायथॉन लँगवेज, डीप लर्निंग न्युरल नेटवर्क्सचे कोर्स तुम्ही करू शकता. किंवा इंजिनिअरिंगमध्ये मशिन लर्निंग हे वेगळी शाखा उदयास आली आहे. जर तुम्ही बारावी नुकतेच पास झाला असेल तर इंजिनिअरिंग घेताना मशिन लर्निंग शाखा निवडू शकता.  (Top Paying Jobs in India) किंवा पदवीनंतर थेट मशिन लर्निंगचा कोर्स करू शकता. बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, मुंबई, पुणे अशा आयटी हब शहरांमध्ये सर्वाधिक संधी आहेत. हा कोर्स करण्यासाठी आयटी बॅकग्राउंड असावा असे आवश्यक नाही. मात्र, बेसिक माहिती असावी लागते. 

ब्लॉकचेन डेव्हलपर्स 

आर्थिक व्यवहार आता इंटरनेट आणि डिजिटल माध्यमातून होण्याचे प्रमाण वाढले आहे. (Highest  Paying Jobs in India) क्रिप्टो करन्सी, व्हर्च्युअल करन्सी आणि इतर डिजिटल पेमेंट सिस्टिम तयार करताना ब्लॉकचेन डेव्हलपरची गरज लागते. DiFi म्हणजेच डिसेंट्रलाइज्ड फायनान्स तंत्रज्ञान नक्की काय आहे हे आधी नीट समजून घ्या. 

दोन वर्षांपेक्षा जास्त अनुभव असेल तर 6 लाख वार्षिक पॅकेज मिळू शकते. तसेच 8-10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव झाल्यास 45 लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळू शकते. जास्त पॅकेज मिळण्यासाठी अनुभव महत्त्वाचा आहे. मार्केटमध्ये ब्लॉकचेन डेव्हलपरचे अनेक कोर्सेस तुम्हाला मिळतील. 

फुल स्टॅक सॉफ्टवेअर डेव्हलपर 

एखाद्या सॉफ्टवेअर किंवा अॅप्लिकेश फ्रँट एंड आणि बॅक एंड दोन्ही बाजू डेव्हलप करता येणाऱ्याला फुल स्टॅक डेव्हलरपर असे म्हणतात. फ्रेशर्सला साडेतीन ते चार लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळू शकते. पाच वर्षांपेक्षा जास्त अनुभव झाल्यास 15 लाख रुपयांपेक्षा जास्त पॅकेज मिळू शकते. मोठ्या शहरांमध्ये फुल स्टॅक डेव्हलवरचे अनेक कोर्सेस तुम्हाला करता येतील. 

प्रॉडक्ट मॅनेजमेंट 

बदलत्या काळानुसार प्रॉडक्ट मॅनेजमेंटला मोठी डिमांड आली आहे. फेसबुक, झोम‌ॅटो, इन्स्टाग्राम, शादी डॉट.कॉम अशी संकेतस्थळे म्हणजे एक प्रॉडक्टच आहेत. त्याशिवाय इतर उत्पादनांसाठीही प्रॉडक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल्सची गरज लागते. (Top Paying Jobs in India) एखादे प्रॉडक्ट पूर्णपणे व्यवस्थापित करण्याचे कौशल्य असावे लागते. फ्रेशर्ससाठी थेट प्रॉडक्ट मॅनेजर जॉब मिळणे थोडे अवघड आहे. मात्र, विविध रोलवर आधी काम केल्यानंतर प्रॉडक्ट मॅनेजर होता येते. अनुभवानंतर 25 लाखांपेक्षाही जास्त पॅकेज सहज मिळू शकते. 

वैद्यकीय क्षेत्र

भारताची लोकसंख्या 140 कोटींच्या जवळ पोहचली आहे. महिला, लहान मुले, वयोवृद्ध यांच्यासाठी विविध स्पेशलायझेशन असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांची गरज आहे. तसेच बदलत्या जीवन शैलीमुळे नवनवे आजाराही येत आहे. (Highest  Paying Jobs) वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही स्वत:चे रुग्णालय सुरू करू शकता. तसेच इतर मोठ्या रुग्णालयामध्ये प्रॅक्टिस करू शकता. 

भारतामध्ये मेडिकल क्षेत्रात काम करणाऱ्यांना सरासरी 10 वार्षिक पगार मिळतो. अनुभव आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे उत्पन्न यापेक्षा जास्त असू शकते. डॉक्टर वगळता इतरही अनेक प्रोफेशनल्सची गरज वैद्यकीय क्षेत्रात लागते. 

टीप - अनुभव, कौशल्य, शिक्षण यासह इतरही अनेक गोष्टी पाहून कंपन्या पगार देतात. लेखात दिलेली आकडेवारी अंदाजे आहे.  कोर्सची निवड करताना अधिकृत शिक्षण सल्लागाराची मदत घ्या.