Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Women Reservation Bill: आरक्षण विधेयकातून महिलांना कोणते अधिकार आणि हक्क मिळणार, जाणून घ्या

Women Reservation Bill 2023

Image Source : www.thequint.com

Women Reservation Bill: महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत महिला आमदारांची संख्या जवळपास 100च्या आसपास असेल. तर 543 जागांच्या लोकसभेत महिला खासदारांची संख्या नियमानुसार किमान 181 असणे अपेक्षित असणार आहे.

Women Reservation Bill: संसदेच्या विशेष अधिवेशन सोमवारपासून (दि. 18 सप्टेंबर) सुरू झाले. विशेष अधिवेशाचा पहिला दिवस जुन्या इमारतीच्या आठवणींच्या उजळणीत गेला. तर नवीन इमारतीत मंगळवारपासून (दि. 19 सप्टेंबर) अधिवेशन सुरू झालं. या ऐतिहासिक घटनेबरोबरच संसदेच्या नवीन इमारतीत महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) मांडण्यात आलं. कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे बिल लोकसभेत मांडलं. या विधेयकाला नारीशक्ती वंदन अधिनियम असं नाव देण्यात आलं आहे.

17 व्या लोकसभेच महिलांचे प्रमाण 15 टक्के

महिला आरक्षण विधेयकांच्या माध्यमातून सरकार महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण देणार आहे. त्यामुळे या बिलाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. या बिलामुळे राजकारणातील महिलांची संख्या वाढणार आहे. सध्या प्रत्येक पक्षाच्या धोरणानुसार आणि महिलांच्या संख्येनुसार महिला उमेदवार दिल्या जात आहेत. 2019 मध्ये झालेल्या 17 व्या लोकसभेमध्ये सर्वाधिक 78 महिला खासदार आहेत. या अगोदरच्या लोकसभेत महिला खासदारांची संख्या 62 होती.  

लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण

महिला आरक्षण विधेयकामध्ये नमूद करण्यात आलेल्या तरतुदीनुसार महिलांना फक्त लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. हे आरक्षण राज्यसभा आणि विधानपरिषदेला लागू नसणार नाही. याशिवाय सध्या मिळत असलेल्या अनुसूचित जाती आणि जमातीतील उमेदवारांसाठी आरक्षित असलेल्या प्रवर्गातून महिलांना आरक्षण मिळणार आहे. ओबीसी प्रवर्गासाठी वेगळे आरक्षण नसणार.

महाराष्ट्रात 288 पैकी फक्त 24 महिला आमदार

2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एकूण 288 जागांपैकी 24 जागांवर महिला आमदार निवडून आल्या आहेत. एकूण सदस्य संख्येच्या तुलनेत हे प्रमाण 8 टक्के आहे. महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत महिला आमदारांची संख्या जवळपास 100च्या आसपास असेल. तर 543 जागांच्या लोकसभेत महिला खासदारांची संख्या नियमानुसार किमान 181 असणे अपेक्षित असणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षण

राज्याचा विचार केला तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. महाराष्ट्राने याबाबतचा कायदा यापूर्वीच केला आहे. त्यामुळे सध्या महानगरपालिकेपासून, जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समितींमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण लागू आहे.