Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Udyam Registration: उद्यम नोंदणी काय आहे? तुमच्या उद्योगासाठी किती गरजेचे? जाणून घ्या रजिस्ट्रेशनची संपूर्ण प्रक्रिया

Udyam Registration

भारत सरकारच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे उद्योगांची नोंदणी करण्यासाठी वर्ष 2015 मध्ये उद्योग आधारची सुरुवात करण्यात आली होती. जुलै 2020 साली सरकारने यात बदल करून उद्यम रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू केली.

कोणताही उद्योग सुरू करायचा असल्यास त्यासंदर्भात नोंदणी करणे आवश्यक असते. काही वर्षांपर्यंत ही प्रक्रिया किचकट होती. मात्र, भारत सरकारने उद्योगांची नोंदणी ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिल्याने ही प्रक्रिया सोपी झाली आहे. भारतात लाखो सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग आहेत. या उद्योगांची नोंदणी केल्यास अनेक फायदे मिळतात. यासाठी सरकारने उद्यम रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू केली आहे. तुम्ही देखील उद्योगाची नोंदणी करण्याचा विचार करत असाल तर यासंदर्भातील प्रक्रिया काय आहे, ते सविस्तर जाणून घ्या.

काय आहे उद्यम/उद्योग आधार?

भारत सरकारच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे उद्योगांची नोंदणी करण्यासाठी वर्ष 2015 मध्ये उद्योग आधारची सुरुवात करण्यात आली होती. या अंतर्गत व्यवसायिकांना त्यांच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांची नोंदणी करता येते. जुलै 2020 साली सरकारने यात बदल करून उद्यम रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू केली.

थोडक्यात, ही एकप्रकारे उद्योगासाठी असलेली आधार प्रक्रिया आहे. उद्यम अंतर्गत नोंदणी केल्यावर 12 आकडी नोंदणी क्रमांक व ऑनलाईन प्रमाणपत्र दिले जाते. या अंतर्गत नोंदणीचे इतरही अनेक फायदे मिळतात.

उद्यम नोंदणीसाठी पात्रता

उद्यम अंतर्गत नोंदणी करण्यासाठी तो व्यवसाय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग प्रकारात मोडणे आवश्यक आहे. यासह ठराविक गुंतवणूक व एकूण उलाढालीची देखील आहे. याबाबत पुढे माहिती दिली आहे.

उद्योग  

गुंतवणूक  

एकूण उलाढाल  

सूक्ष्म  

1 कोटी रुपयांपर्यंत  

5 कोटी रुपयांपर्यंत  

लघू  

10 कोटी रुपयांपर्यंत  

50 कोटी रुपयांपर्यंत  

मध्यम  

50 कोटी रुपयांपर्यंत  

250 कोटी रुपयांपर्यंत  

उद्योगांसाठी उद्यम नोंदणी अनिवार्य?

सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी उद्यम अंतर्गत नोंदणी करणे अनिवार्य नाही. मात्र, या अंतर्गत नोंदणी केल्यास उद्योग इतर फायदे मिळविण्यास पात्र ठरतो.

उद्यम अंतर्गत नोंदणी करण्याचे फायदे काय?

  1. या अंतर्गत नोंदणी केल्यास बँकांकडून कर्ज मिळण्यास सोपे जाते व अशा उद्योगांना कर्ज देताना प्राधान्य मिळते.
  2.  या उद्योगांना सरकारी योजना, अनुदान, सरकारी निविदांचा देखील फायदा मिळतो.
  3. तसेच, खरेदीदाराकडून पेमेंट येण्यास विलंब झाला तर तक्रार करता येते व याबाबत अतिरिक्त व्याजदरासह भरपाई मिळते.

उद्योग आधारमधून उद्यममध्ये नोंदणी कशी कराल?

  1.  तुम्ही पहिल्यांदाच उद्यमवर नोंदणी करत असाल तर यासाठी https://udyamregistration.gov.in/ वेबसाईटला भेट द्यावी लागेल. नोंदणीसाठी तुमच्याकडे आधार, पॅन कार्ड आणि GSTIN असणे आवश्यक आहे. ही नोंदणी पूर्णपणे मोफत आहे.
  2.  जर तुम्ही याआधी उद्योग आधारमध्ये नोंदणी केली असल्यास व आता उद्यममध्ये स्थलांतरित करण्यासाठी याच वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  3. येथे तुम्हाला ‘For those already having registration as UAM’ पर्याय दिसेल.
  4. यानंतर आधार नंबर व्हेरिफाय करून ‘Migration from UAM to Udyam Registration’ वर क्लिक करा.
  5. पुढे तुम्हाला पॅन, GSTIN व तुमची इतर माहिती द्यावी लागेल. ‘EM-II’ अथवा ‘Previous UAM’ याबाबत माहिती देऊन, उद्योगानुसार NIC code भरा. अशाप्रकारे पुढे दिलेली माहिती भरून तुम्ही उद्यम पोर्टलवरील नोंदणी पूर्ण करू शकता.