• 09 Feb, 2023 08:01

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What Exactly is CVV Number on Debit & Credit Cards: जाणून घ्या, डेबिट व क्रेडिट कार्डवरील CVV नंबर म्हणजे नक्की काय?

What is a CVV Number

Image Source : http://www.quora.com/

What is a CVV on A Debit Or Credit Card: आपण जर ऑनलाइन शाॅपिंग किंवा कोणती फी भरत असाल म्हणजेच थोडक्यात एखादा ऑनलाइन व्यवहार करत असाल तर डेबिट व क्रेडिट कार्डवरील CVV नंबर हा मागितला जातो. मात्र हा CVV नंबर म्हणजे काय असतो, याबाबत अधिक जाणून घेवुयात.

Is CVV & ATM PIN Same: तुम्ही कोणताही ऑनलाइन पेमेंट करत असाल, तर तुम्हाला नक्कीच CVV नंबर म्हणजेच कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू नंबर विचारण्यात येतो. हा नंबर फक्त कार्ड वापरण्याची परवानगी घेतो. तो कोणत्याही प्रकारचा पिन नंबर नसतो. याच CVV संदर्भात अधिक माहिती जाणून घेवुयात.

CVV नंबर म्हणजे काय (What is a CVV Number)

कोणताही ऑनलाइन व्यवहार करताना CVV (Card Verification Value) नंबर विचारण्यात येतो. थोडक्यात हा नंबर तुमचा परवानगी घेतो. कार्डधारक तुम्हीच आहात का, याची तो पुष्टी करतो. तसेच तो कोणत्याही प्रकारचा पिन क्रमांक नसतो. या कार्डच्या मागील साइडला मॅग्नेटिक स्ट्रिप चिप असते. यामध्ये सर्व डेटा असतो. तसेच त्याच्या शेजारी तीन नंबर असतात. जे केवळ फक्त कार्ड धारकालाच माहित असतात. त्यामुळे फसवणुक होऊ नये यासाठी हा CVV हा नंबर विचारण्यात येतो. हा नंबर कोणत्याही व्यक्तीशी शेअर करू नये असे वारंवार बॅंकेक़डून आवाहनदेखील केले जाते.

ऑनलाइन व्यवहारसाठी आवश्य (Required for Online Transactions)

ऑनलाइन व्यवहार करताना CVV हा नंबर आवश्य लागतो. तसेच डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरताना हा  नंबर कॉपीदेखील करता येत नाही. जर कार्ड डेटामध्ये कोणतेही फेरफार झाल्यास ऑनलाइन व्यवहार हा पूर्ण होत नाही. क्रेडिट किंवा डेबिट कार्डशी संबंधित संपूर्ण माहिती ही ऑनलाइन पेमेंटच्या स्वरूपात असूनदेखील ऑनलाइन व्यवहारादरम्यान CVV क्रमांक द्यावा लागतो.

सावध रहा (Be Careful)

 काही ठिकाणी जर कार्ड व्यवहारांसाठी CVV क्रमांक लागत नसेल, तर यादरम्यान सायबर गुन्हेगारांना फसवणूक करण्याची आयती संधी प्राप्त होते. याला कार्ड व्हेरिफिकेशन कोड (CVV) देखील म्हणतात. ज्याप्रमाणे आपल्या येथील कार्डवर तीन नंबर असतात, त्याप्रमाणे अमेरिकन एक्सप्रेस कार्ड्सच्या समोर 4 नंबर असणारा CVV क्रमांक असतो. 1995 मध्ये यूकेच्या मायकेल स्टोनने या CVV नंबरचा शोध लावला होता. जो आजतागायत खूप महत्वाची भूमिका पार पाडत आहे. यामुळे ऑनलाइन व्यवहारांसंबंधीची फसवणूकीला लगाम घालता येते.