Types OF USB: ऑफिस असो या घर जिथे जाऊ, त्याठिकाणी आपण चार्जर नेण्यास विसरलो, तर आपण लगेच दुसऱ्याकडे चार्जर आहे का, याची चौकशी करतो. पण त्यातही अट असते की, तुमच्याकडे ‘सी’ चा USB आहे का? दररोजच्या वापरातील याच युएसबीचे किती प्रकार असून त्याचे काम काय आहेत, हे प्रत्यक्षात जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
युएसबीचा उपयोग कुठे होतो?
USB चा उपयोग साधारणपणे फ्लॅश ड्राइव्ह, कीबोर्ड, प्रिंटर, स्कॅनर, मीडिया प्लेयर या सर्वाचा वापर कंप्यूटर जोडण्यासाठी केला जातो. तसेच, विविध उपकरणे चार्ज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जाते. जसे की, फिटनेस बँड, मोबाईल, कॅमेरा, स्मार्टवॉच, पॉवर बँक, Mp3 प्लेअर, व्हिडिओ गेम्स, ब्लूटूथ स्पीकर इ. यूएसबी हे प्लग अँड प्ले (पीएनपी) उपकरण आहे, जे कनेक्ट करताच, आपोआपच चार्ज करण्यास सुरुवात करतात.
युएसबी सी ( USB Type C)
रोजच्या जीवनात आपण ऐकतो की, तुझ्याकडे ‘सी’ टाइपचा (C Type) चा चार्जर आहे का? हा रोजच्या वापरातील ‘सी’ टाइपच्या युएसबी विषयी माहिती का? हा USB 2013 मध्ये लाँच करण्यात आला. हा आतापर्यंतचा सर्वात वेगवान कनेक्टर असल्याचे मानले जाते. तसेच याचा वापरदेखील मोठया प्रमाणात केला जातो. भविष्यात प्रत्येक उपकरणात फक्त टाइप-सी पोर्ट दिसेल. कारण सध्याचे जग हे युएसबी ‘सी’ चे आहे. स्मार्टफोनप्रमाणेच टाइप-सी पोर्ट हा लॅपटॉप आणि इतर गॅजेट्समध्येदेखील पाहायला मिळेल.
युएसबी ए ( USB Type A)
यूएसबी ‘ए’ (A) देखील सर्वसामान्यात मोठया प्रमाणात वापरला जाणारा प्रकार आहे. या टाइपचे युएसबी तुम्हाला सर्वत्र पाहायला मिळेल. चार्जरचे एक टोक फक्त USB प्रकार A आहे. याशिवाय पेनड्राइव्ह, लॅपटॉप, कॉम्प्युटर, इत्यादींमध्येदेखील युएसबी टाइप ‘ए’ पाहायला मिळतो. याव्यतिरिक्त लॅपटॉप, कॉम्प्युटर, पेनड्राइव्ह यामध्येदेखील टाइप ‘ए’ सहज दिसतो.
युएसबी केबल (USB Cable)
आजच्या काळात ‘यूएसबी केबल’ जवळपास प्रत्येक घरात पाहायला मिळतो. फोनपासून ते सर्व गॅझेटपर्यंत याच माध्यमात चार्ज केले जाते . हे डेटा ट्रान्सफरमध्ये देखील वापरले जाते. पण, तुम्ही नेहमी जे हे डिव्हाइस वापरता, त्यानुसार यूएसबीचे अनेक प्रकार आहेत.