1986च्या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला 6 महत्त्वपूर्ण हक्क मिळाले आहेत. त्या हक्कांचा पुरेपूर वापर ग्राहकांनी केला तर कोणताही विक्रेता त्याची फसगत करू शकणार नाही.
Table of contents [Show]
भारतीय ग्राहकांना मिळालेले 6 हक्क कोणते?
माहितीचा हक्क
एखाद्या उत्पादनाबद्दल सर्व माहिती मिळवणे हा ग्राहकांचा हक्क आहे. त्या उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, संख्या, शुद्धता, किंमत या सर्वांची माहिती मिळवण्याचा हक्क ग्राहकांना आहे. सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासून घेण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. कोणतीही वस्तू घेण्यापूर्वी त्या वस्तू बद्दलचीपूर्ण माहिती घेण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. हा हक्क कोणताही दुकानदार किंवा व्यावसायिक नाकारू शकत नाही.
सुरक्षेचा हक्क
आपण विकत घेतलेली वस्तू सुरक्षित आहे की नाही, हे जाणून घेण्याचा हक्क प्रत्येक ग्राहकाला आहे. इलेक्ट्रिकल वस्तूंची खरेदी करताना ती वस्तू खराब तर नाही ना, याची चौकशी करण्याचा हक्क ग्राहकाला प्राप्त झाला आहे. एखादी वस्तू विकत घेतांना त्या वस्तूच्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी उत्पादकांनी घेणे अनिवार्य असते. कोणत्याही वस्तूंच्या वापरामुळे शारीरिक किंवा आर्थिक नुकसान झाले तर कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागते. आयएसआय मार्क आणि एक्सपायरी डेट तपासूनच ग्राहकांनी वस्तू खरेदी करावी.
मत मांडण्याचा हक्क
एखाद्या ठिकाणी फसवणूक झाली आहे असे वाटत असल्यास ग्राहकांना त्यांचे मत मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सरकारने तक्रार निवारण केंद्र आणि ग्राहक न्यायालयांची स्थापना केली आहे. ग्राहक त्यांचे मत सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी ग्राहक मंचाची स्थापना करू शकतात. म्हणून,ग्राहकांना वस्तूबाबत काहीही संशयास्पद वाटले तर, मत मांडून तक्रार करण्याचाहक्क ग्राहकांना आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात ग्राहकांना हव्या त्या ब्रॅण्डच्या वस्तूंची निवड करण्याचाअधिकार लाभला आहे. कोणताही विक्रेता विशिष्ट ब्राची वस्तू खरेदी करण्यास सांगत असेल तर ते ग्राहकांच्या नियमांचे उल्लंघन ठरू शकते. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्याचा ग्राहकांना अधिकार आहे म्हणूनच, कोणताही विक्रेता ग्राहकांना विशिष्ट वस्तू घेण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही.
तक्रार करण्याचा आणि निवारण करून घेण्याचा हक्क
कोणत्याही ग्राहकाची फसवणूक झाली असेल तर त्याला तक्रार नोंदवण्याचा हक्क आहे. जर तक्रार योग्य असेल तर तक्रारींचे निवारण होईल,असा हक्क कायद्याने ग्राहकांना दिला आहे. कोणत्याही छोट्या किंवा मोठ्या तक्रारींविरुद्ध ग्राहक दाद मागू शकतात.
ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा हक्क
प्रत्येक ग्राहकांनी त्यांना मिळालेले हक्क आणि अधिकार यांची पूरक माहिती घेऊन त्यानुसार वागले पाहिजे. हक्कांची माहिती देण्यासाठी शासनातर्फे वेग-वेगळे उपक्रम राबवले जातात. तसेच कार्यशाळा आणि शिबिरांचे आयोजन करून ग्राहकांना माहिती दिली जाते.
अशाप्रकारे, या 6 हक्कांनुसार ग्राहकांनी आपले मत मांडून, योग्य उत्पादनाची निवड करून, फसणुकीची तक्रार करून हव्या त्या हक्कांची अंमलबजावणी केली तर, कोणताही विक्रेता किंवा ऑनलाईन व्यापारात ग्राहकांची फसगत होऊ शकणार नाही.