Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Low interest rates: 'या' बँकांकडून मिळणार कमी व्याजदरात लोन, जाणून घ्या

Low interest rates

Low interest rates: पर्सनल लोन लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करते. तुम्ही ऑनलाइन पर्सनल लोन (Personal Loans) मंजूर देखील करू शकता आणि तुमच्या खात्यात पैसेही घरी बसून येऊ शकतात. पर्सनल लोन अधिक जोखमीचे असल्याने त्यावर अधिक व्याज आकारले जाते.

Low interest rates: पर्सनल लोन लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करते. तुम्ही ऑनलाइन पर्सनल लोन मंजूर देखील करू शकता आणि तुमच्या खात्यात पैसेही घरी बसून येऊ शकतात. पर्सनल लोन  अधिक जोखमीचे असल्याने त्यावर अधिक व्याज आकारले जाते. आरबीआयकडून रेपो दरात वाढ केल्यानंतर त्यात आणखी वाढ झाली आहे. अशा वेळी जर तुम्ही पर्सनल लोन  घेण्याचा विचार करत असाल, तर ज्या तुम्हाला अत्यंत कमी व्याजावर कर्ज (Low interest rates) देणाऱ्या बँका आहेत त्याबद्दल माहिती असायला हवी. कोणती बँक कोणत्या व्याजावर किती कर्ज आहे ते जाणून घेऊया.

कमी व्याजावर कर्ज देणाऱ्या बँका (Banks that offer low interest loans)

बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, IDBI बँक या बँका कमी व्याजदरावर कर्ज देत आहे, व्याजदर किती ते जाणून घेऊया. 

बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra)

bank-of-maharashtra-1.jpg
http://www.business-standard.com/

20 लाख रुपयांपर्यंतच्या पर्सनल लोनवर 84 महिन्यांच्या कालावधीसाठी 8.90 टक्क्यांहून अधिक व्याज आकारले जाईल. 

बँक ऑफ इंडिया (Bank of India)

bank-of-india-1.jpg
http://www.india.com/

84 महिन्यांच्या कालावधीसाठी 20 लाखांपर्यंत कर्ज देत आहे, ज्यावर 9.75 टक्के ते 14.25 टक्के व्याज आकारले जाईल.

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank)

punjab-national-bank.jpg
http://www.patrika.com/

60 महिन्यांच्या कालावधीसाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देत आहे, ज्यावर 9.80 टक्के ते 16.35 टक्के व्याज आकारले जाईल.

IDBI बँक (IDBI Bank)

idbi-bank.jpg
http://www.india.com/

25 हजार किंवा त्याहून अधिक आणि 5 लाखांपर्यंतच्या कर्जावर 12 ते 60 महिन्यांसाठी 9.90 ते 15.50 टक्के व्याज आकारेल.

सर्वात कमी व्याजदर (Lowest interest rate)

बँक ऑफ महाराष्ट्र 20 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 84 महिन्यांच्या कालावधीसाठी 8.90 टक्क्यांहून अधिक व्याज आकारेल. म्हणजेच इतर बँकांच्या तुलनेत व्याजदर कमी आहे. 

पर्सनल लोनवरील शुल्क (Charges on Personal Loans)

पर्सनल लोन (Personal Loans)घेण्यासाठी बहुतांश बँका विविध प्रकारचे शुल्क आकारतात. SBI बँक कर्जाच्या रकमेच्या 0.50 ते 1 टक्के प्रोसेस चार्ज आकारेल. त्याचवेळी, पीएनबी बँक 1 टक्क्यांपर्यंत प्रोसेस चार्ज  आणि डॉक्युमेंट चार्ज आकारेल. त्याचप्रमाणे इतर बँका देखील पर्सनल लोन चार्ज  आकारतात. या व्यतिरिक्त, जर तुमचा वैयक्तिक कर्जाचा EMI मधल्या काळात चुकला तर तुम्हाला दंड भरावा लागेल, जो सर्व बँकांकडून वेगळ्या पद्धतीने आकारला जातो.