Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Internal and External Storage Definition: जाणून घ्या, Internal आणि External स्टोरेज अगदी सोप्या भाषेत

Internal and External Storage Definition

what is Internal and External Storage : लॅपटॉप, स्मार्टफोन, डेस्कटॉप व गॅझेट खरेदी करण्यापूर्वी नेहमी स्टोरेज किती आहे, हे पाहिले जाते. मात्र काहींना इंटरनल स्टोरेज माहित असते, तर काहींना एक्सट्रनल स्टोरेज माहिती नसते. तर काहींना तर दोन्ही ही गोष्टी माहिती नसतात, नेमकी याच गोष्टी आज आम्ही सोप्या शब्दांत सांगणार आहोत.

Smartphone Storage Details : प्रत्येक व्यक्ती मोबाईल खरेदी करताना त्या मोबाईलची कंपनी, किंमत, फीचर्स या सर्व गोष्टी तपासून पाहतो. त्यातल्या त्यात मोबाईल किती रॅमचा म्हणजेच त्यामध्ये किती स्टोरेज (जागा) आहे, हे पाहत असतो. मात्र किती जणांना मोबाईल स्टोरेजबाबत काहीच माहीत नसते, त्यामुळेच आम्ही तुम्हाला आज  Internal आणि External स्टोरेज सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत.

इंटरनल स्टोरेज (Internal Storage)

तुम्हाला इंटरनल स्टोरेजमध्ये डिव्हाइसची सिस्टम फाइल्स आणि ॲप फाइल्स स्टोर म्हणजेच सेव्ह (Save) करता येते. थोडक्यात ज्यावेळी तुम्ही तुमच्या फोनमध्ये कोणताही ॲप इंस्टॉल (Download) करता, त्यावेळी तुमच्या फोनमध्ये ऑटोमॅटिक त्याचे प्रायव्हेट फोल्डर आणि काही फाइल्स जनरेट होतात. हे फोल्डर आणि फाइल डिव्हाइसच्या इंटरनल स्टोरेजमध्ये स्टोर (जमा) होतात. या फाइल्सला तुम्ही थेट ॲक्सेस करू शकत नाही. परंतु, ॲप याच फाइल्सचा वापर करू शकतात. याव्यतिरिक्त तुम्ही इंटरनल स्टोरेजमध्ये  फोटो, व्हिडिओ किंवा ऑडियो सुद्धा स्टोर करू शकतात. सध्या पार्टी, ट्रीप व सातत्याने फोटो व व्हिडीओ काढण्याचे प्रमाण वाढल्याने, ग्राहकांना जास्तीत जास्त स्टोर असणाऱ्या मोबाईलची गरज असते. त्यामुळे अधिक स्टोर असलेल्या स्मार्टफोन्सला सध्या खूप मागणी आहे.

एक्सटर्नल स्टोरेज (External Storage)

एक्सटर्नल स्टोरेजमध्ये तुम्ही आपला डेटा ॲड आणि डिलिट ही करू शकता. जसे की, कंप्यूटर किंवा लॅपटॉपमध्ये तुम्ही USB Flash Drives चा वापर करता. याव्यतिरिक्त, जर तुम्हाला स्मार्टफोनमध्ये इंटरनल स्टोरेजसाठी जागा कमी पडली, तर तुम्ही SD Card चा उपयोग करू शकता. एसडी कार्डला एक्सटर्नल स्टोरेज असे ही म्हटले जाते. तुम्ही एक्सटर्नल स्टोरेजमध्ये स्मार्टफोनच्या ॲपच्या फाइलला स्टोर करू शकत नाही. परंतु, External Storge च्या डेटाला सहज ॲक्सेस करून ॲड, ओपन किंवा डिलिट करू शकता. अशा पध्दतीने इंटरनल स्टोरेज व एक्सट्रनल स्टोरेजचा वापर केला जातो.