Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Deadlines: सप्टेंबर महिन्यातील 'या' 5 डेडलाइन माहितीयेत का? नाहीतर होऊ शकते आर्थिक नुकसान

Financial Deadlines

सप्टेंबर महिन्यात आर्थिक व्यवहार करताना जर तुम्ही डेडलाइन पाळली नाही तर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते. 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबर शेवटची तारीख आहे. तसेच अल्पबचत, गुंतवणूक योजनांबाबत डेडलाइन काय आहे जाणून घ्या.

Financial Deadlines in September: सप्टेंबर महिना अर्धा संपला आहे. आर्थिक व्यवहार करण्याची तसेच विविध कामांची शेवटची तारीख चुकवली तर किती पश्चाताप होतो हे तुम्हाला माहितीच आहे. त्याचं एक उदाहरण म्हणजे आधार-पॅन वेळेत लिंक न करणाऱ्यांवर दंड भरण्याची वेळ आली. या लेखात पाहूया आर्थिक व्यवहारासंबंधीत 5 महत्त्वाच्या डेडलाइन कोणत्या आहेत.

स्मॉल सेव्हिंग योजनांसाठी आधार कार्ड 

जर तुम्ही स्मॉल सेव्हिंग योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल आणि आधार कार्ड जमा केले नसेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. 1 ऑक्टोबरपासून अशी गुंतवणूक खाती बंद होतील. आधार जमा करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. सिनियर सिटिझन सेव्हिंग स्किम, पब्लिक प्रोविडंट फंड, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट या योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे.

पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत जाऊन आधार लवकरात लवकर जमा करा. आधार दिले नाही तर खात्यात व्याज जमा होणार नाही. तसेच योजनेत पैसे गुंतवता येणार नाहीत. 

2 हजाराच्या नोटा बदलून घेण्याची शेवटची तारीख

30 सप्टेंबर 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची शेवटची तारीख आहे. त्याआधीच नोटा बँकेत जमा करता येतील किंवा बदलून घेता येतील. यासाठी चार महिने मुदत दिली होती. ती या महिन्याच्या शेवटी संपेल. अन्यथा तुमच्या जवळील दोन हजाराची नोट कागदासमान ठरेल. 

डिमॅट म्युच्युअल फंड खात्यासाठी वारसदार नोंदणी

डिमॅट आणि म्युच्युअल फंड खात्यासाठी वारसदार नोंदणी करण्याची 30 सप्टेंबर 2023 ही शेवटची तारीख आहे. जर तुम्हाला वारसदार नोंदणी करायची नसेल तर पर्याय नाकारता सुद्धा येईल. मात्र, हे काम महिना संपायच्या आत करावे लागेल.

IDBI अमृत महोत्सव मुदत ठेव 

IDBI बँकेच्या अमृत महोत्सव या खास मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. 375 दिवसांच्या मुदत ठेवीवर 7.10% व्याजदर मिळेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.60% व्याजदर मिळेल. तर 444 दिवसांच्या मुदत ठेवींवर सर्वसामान्य नागरिकांना 7.15% व्याज मिळेल आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.65% व्याजदर मिळेल.

एसबीआय वुईकेअर

स्टेट बँकेद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मुदत ठेव योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. या मुदत ठेवीतून 7.50 व्याजदर मिळू शकतो. ज्येष्ठ नागरिकांना आणखी व्याजदर मिळू शकतो.