Tips for Learning Share Market: आजकाल शेअर मार्केट हा शब्द खूप हायलाइट होत आहे. मात्र शेयर मार्केट हा गुंतागुंतीचा विषय असून डोक्यावरून जाणारा आहे. तो न झेपणारा असा विषय आहे. हा जड विषय जर तुम्हाला सोप्या पध्दतीने शिकायचा असेल तर खालील गोष्टींचा अवलंब करून, शेयर मार्केट (Share Market) सोप्या शब्दात समजवून घ्या.
ट्रेडिंग खाते सुरू करा (Open a Trading Account)
शेअर मार्केट प्रॅक्टीकली समजावून घेण्यासाठी ट्रेड्रींग खाते सुरू करा. जसे की, ट्रेडिंग खात्याचा वापर व्यापारी त्यांची रोख रक्कम, सिक्युरिटीज आणि इतर गुंतवणूक ठेवण्यासाठी करतात. तुमची जर हे खाते उघडण्याची इच्छा असेल, तर तुम्ही एक आर्थिक फर्म निवडा, आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरा आणि एकदा पडताळणी केल्यावर तुमच्याकडे सक्रिय ट्रेडिंग खाते सुरू होईल. यानुसार तुम्ही आॅनलाइन खरेदी-विक्री व्यवहार शिकू शकता.
शेअरसंबंधित पुस्तके वाचा (Read Books Related to Share)
पुस्तके कोणतेही असो, ते ही कधीही वाचणे चांगलेच असते. शेअर मार्केटसंबंधी अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहे. ही पुस्तके खरेदी करा व वाचा. पुस्तके हे मार्गदर्शन मिळविण्याचा मोठा खजिना असतो. किंवा आजकाल ऑनलाइन माहितीदेखील मोठया प्रमाणात सोप्या भाषेत उपलब्ध आहे. शिवाय तुम्हाला कोणते पुस्तक कोणत्या भाषेत उपलब्ध आहे, याची माहिती सहज प्राप्त होईल.
संबंधित लेख वाचा (Read Related Articles)
शेअर बाजाराबद्दल अनेक लेखकांनी लिहिलेले असंख्य लेख आहेत. वॉरन बफे (Warren Buffett) सारख्या गुंतवणूकीपासून ते सामान्य ब्लॉगरपर्यंत, तुम्हाला माहिती आणि दिशा देण्यासाठी अनेक ऑनलाइन लेख आहेत. वॉरन बफेसारख्या महापुरुषाचे अनुभव वाचणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच नवीन व्यक्तींचे अनुभव वाचणेही महत्त्वाचे आहे. या दोघांकडून खूप काही शिकता येईल. स्टॉक मार्केटवरील काही प्रसिद्ध लेखकांनी प्रकाशित केलेल्या लेखांसाठी किंवा कोणत्याही विशिष्ट विषयासाठी तुम्ही Google Alerts सेट करू शकता तसेच शेयर मार्केटविषयीची माहिती सहज व सोप्या भाषेत वाचण्यासाठी ‘महाMoney’ सारखे ऑनलाइन पोर्टलदेखील उपलब्ध आहे.