Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Egg Prices Increased: जाणून घ्या, थंडीत अंडयाच्या दरात किती वाढ झाली असून त्यामागे काय कारणे आहेत

Egg Prices Increased:

Why are Eggs More Expensive in Winte: थंडीत अंडी खाण्याचे प्रमाण वाढते. कारण अंडयांमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्यामुळे हिवाळयात अंडी खाणे शरीरास चांगले असते.मात्र वाढती मागणी असली, तरी अंडयाच्या दरात किती वाढ झाली आहे व यामागे काय कारणे आहेत, याबाबत जाणून घेवुयात.

Egg Prices Increased: हिवाळयात अंडयाच्या तुटवडयामुळे अंडयांच्या दरात दोन रूपयांनी वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसोबतच छोटया-मोठया व्यावसायिकांवरदेखील पडत आहे. नेमकी अंडयाच्या किंमतीत झालेली वाढ कशामुळे झाली, याबाबतची कारणे जाणुन घेवुयात. 

किती रूपयांनी महाग झाली (By How much Rupees has it become Expensive)

स्वस्त व पौष्टिक म्हणून अंडयाकडे पाहिले जाते. त्यामुळे थंडीत ही सर्वसामान्य लोकांच्या खाण्यात मोठया प्रमाणात अंडी दिसतात. मात्र आता अंडयांच्या दरात दोन रूपयांनी वाढ झाल्याने सर्वसामान्यासहित छोटे-मोठे व्यावसायिकांच्या खिशावर ताण पडला आहे. मागील महिन्यात किरकोळ बाजारात अंडयाचा दर 60 रूपये ते 63 रूपये प्रतिडझन होता. आता हीच अंडी 75 रूपये ते  84 रूपयांना विकली जात आहे. यांचे कारण म्हणजे पशुखादय महाग झाले आहे, तर अंडयांचा तुटवडादेखील जाणवत असल्याने अंडयाच्या दरात वाढ झाली आहे.

कोणत्या जिल्हयातून होते आवक (From Which District is the Income)

महाराष्ट्रात सोलापूर, औरंगाबाद, सांगली, पुणे आदि जिल्हयातून अंडयांची मोठया प्रमाणात आवक होते. तसेच तेलंगणा, हैदराबाद, कर्नाटक, तामिळनाडू ही राज्यदेखील मोठया प्रमाणात महाराष्ट्रात अंडयांचा पुरवठा करतात. मागील वर्षी कोंबडयांच्या खादयाच्या दरात 50 ते 60 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांवरदेखील याचा मोठा परिणाम झाला आहे. कारण काही महिन्यांपूर्वी अंडी प्रतिशेकडा 530 रुपये किंमतीत विकली जात होती. आता दरवाढीमुळे अंडयाची विक्री 630 ते 700 रूपये दराने होत आहे.

दर वाढण्याची कारणे (Reasons for Rate Hike)

मागील वर्षी पशुखाद्याच्या किंमतीत झालेल्या दरवाढीमुळे कुक्कुटपालन व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. कारण कोंबड्यांच्या प्रजननाची कालमर्यादा संपल्यानंतर कुक्कुटपालक अंड्यांच्या उत्पन्नासाठी नवीन कोंबड्या आणतात. मात्र पशुखादय महाग झाल्यामुळे कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी नवीन कोंबडया आणल्या नाहीत. त्यामुळे अंडयांचा तुटवडा निर्माण झाला व अंडयाच्या दरात वाढ झाली.