Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Loan Tenure कमी करण्यासाठी जाणून घ्या बेस्ट ट्रिक्स

How to reduce Home Loan Tenure

Image Source : www.bankofindia.co.in

Home Loan Tenure: होम लोनचा कालावधी हा किमान 20 ते 25 वर्षांचा असतो. त्यामुळे इतकी वर्षे प्रत्येक महिन्याला न चुकता ईएमआय भरावा लागतो. नाहीतर दंड म्हणून आणखी आर्थिक भुर्दंड पडू शकतो. हा 20 ते 25 वर्षांचा ईएमआय भरण्याचा कालावधी तुम्ही ठरवले तर नक्की कमी करू शकता आणि या ईएमआयच्या त्रासातून स्वत:ची लवकर सुटका करून घेऊ शकता.

Home Loan Tenure: प्रत्येकाची इच्छा असते की, स्वत:च्या मालकीचे घर असावे. मग ते घर लहान असो किंवा मोठे, बिल्डिंगमध्ये असो किंवा बंगला असो. या घरासाठी एक-एक पैसा जोडून रक्कम उभी केली जाते. ज्यांना स्वत:हून पैसे उभारणे शक्य नाही. ते बँकांकडून कर्ज घेतात. पण बऱ्याचदा होम लोन घेतल्यानंतर काही जणांना प्रत्येक महिन्याला ईएमआय भरणे अवघड जाते किंवा ईएमआय भरल्यानंतर महिन्याचा खर्च भागवताना नाकी-नऊ येते. अशावेळी होमलोनचे बर्डन कमी केल्यास त्यातून थोड्या फार प्रमाणात सुटका होऊ शकते.

होम लोनचा कालावधी हा किमान 20 ते 25 वर्षांचा असतो. त्यामुळे इतकी वर्षे प्रत्येक महिन्याला न चुकता ईएमआय भरावा लागतो. नाहीतर दंड म्हणून आणखी आर्थिक भुर्दंड पडू शकतो. हा 20 ते 25 वर्षांचा ईएमआय भरण्याचा कालावधी तुम्ही ठरवले तर नक्की कमी करू शकता आणि या ईएमआयच्या त्रासातून स्वत:ची लवकर सुटका करून घेऊ शकता. चला ईएमआयचा कालावधी कमी करण्याचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत. ते आपण पाहणार आहोत.

डाऊन पेमेंट जास्त करा

सध्याच्या बँका घराच्या एकूण किमतीपैकी जवळपास 70 ते 80 टक्के कर्ज उपलब्ध करून देतात. त्यामुळे तुम्हाला फक्त 15 टक्के रक्कम स्वत:कडील भरावी लागते. पण यामुळे तुमची कर्जाची रक्कम वाढते. त्यामुळे आपोआप कर्जाचा हप्ता आणि कर्ज फेडण्याची वर्षे वाढतात. ती कमी करण्यासाठी जास्तीत जास्त डाऊन पेमेंटची रक्कम स्वत:हून जमा करा. शक्य असल्यास जवळच्या नातेवाईकांकडून पैसे घ्या. कारण त्यावर तुम्हाला व्याज द्यावे लागणार नाही. डाऊन पेमेंट जास्त दिल्यावर तुमची कर्जाची रक्कम आणि कालावधी कमी होऊ शकतो.

ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीचा वापर करा

घर खरेदी केल्यानंतर तुमच्या पगारात वाढ झाली किंवा तु्म्हाला अतिरिक्त रक्कम मिळत असेल तर ती तुमच्या होमलोनच्या अकाउंटला लगेच भरत जा. महिन्याच्या ईएमआयपेक्षा थोडी जास्त रक्कम भरून तु्म्ही कर्जातील मुद्दल रक्कम कमी करू शकता. अशापद्धतीने तुम्ही जर नियमित ओव्हरड्राफ्टचा वापर केला तर तुमची कर्जाची रक्कम हळुहळू कमी होऊन तुमच्या ईएमआयचा कालावधीदेखील कमी होत जाईल.

ईएमआयची रक्कम वाढवा

होम लोन घेतल्यानंतर बँकेने ठरवून दिलेला ईएमआय हा भरावाच लागतो. पण त्याव्यतिरिक्त तुम्ही ईएमआयपेक्षा जास्तीची रक्कम त्या खात्यात भरली तर तुमचे कर्जाचा कालावधी कमी होऊ शकतो किंवा प्रत्येक वर्षी तुम्ही जर एक जास्तीचा ईएमआय भरला तरी तुमचा कालावधी कमी होऊ शकतो.

पार्ट पेमेंट करा

होम लोन घेतल्यानंतर त्याचा नित्यनियमाने EMI भरण्यात समाधानी राहू नका. जेव्हाही तुमच्याकडे एखादी जास्तीची रक्कम येईल. तेव्हा ती रक्कम कर्जाचे पार्ट-पेमेंट म्हणून भरण्याची सवय ठेवा. यामुळे तुमचे कर्ज हळुहळु कमी होईल आणि कर्जाची रक्कम कमी झाली की आपोआप कर्जाचा कालावधी देखील कमी होईल.

लोन रिसेट करा

लोन रिसेट प्रक्रियेद्वारे तुम्ही बँकेला सांगून EMI ची रक्कम वाढवून घ्या. कारण नोकरीमध्ये आपल्या ठराविक वर्षांनी प्रमोशन मिळते. पगारात वाढ होते. पण आपण आपला होम लोनचा ईएमआय तेवढाच ठेवतो. त्याऐवजी पगार वाढला की लगेच लोन रिसेट करून ईएमआयची रक्कम वाढवून घ्या आणि कर्जाचा कालावधी करून लोनच्या जंजाळातून स्वत:ची लवकर सुटका करा.

लोन ट्रान्सफर करा

लोनचा कालावधी कमी करण्याचा लोन ट्रान्सफर हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही ज्या व्याजदराने होम लोन घेतले होते. त्याच्यापेक्षा कमी व्याजदराने दुसरी बँक कर्ज देत असेल, तर तुमचे लोन त्या बँकेत ट्रान्सफर करा. यामुळे तुमचे पैसेही वाचतील आणि कालावधीही कमी होईल.

अशाप्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यायांचा वापर करून तुमच्या होम लोनचा कालावधी कमी करू शकता. सध्या होम लोन मिळवणे खूपच सोपे आहे. पण न चुकवता प्रत्येक महिन्याला वर्षानुवर्षे हफ्ते भरणे हे सोपे नसते.