कष्टाने कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणे फार महत्वाचे आहे. बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. यामध्ये गुंतवणूकदार जोखीम आणि परताव्याच्या दृष्टीने गुंतवणुकीचा पर्याय निवडतात.दरम्यान, केंद्र सरकारद्वारे संचलित पोस्ट ऑफिसकडूनही विविध बचत योजना उपलब्ध करण्यात येत आहेत. पोस्टाच्या योजनांची हमी आणि परताव्याची सुरक्षितता त्यामुळे नागरिकांकडून याला नेहमीच पहिली पसंती दिली जाते.अशीच एक योजना किसान विकास पत्र (KVP)योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणुकीची रक्कम निश्चित कालावधीत दुप्पट होते.
भारतीय पोस्ट विभागाकडून नागरिकांसाठी आर्थिक गुंकवणुकीच्या बाबतीत विविध योजना आणल्या जातात. त्यापैकीच एक किसान विकास पत्र (KVP)योजना ही एक लोकप्रिय योजना ठरत आहे. या योजनेमध्ये गुंतवणूकदारास फक्त 115 महिन्यात (9 वर्ष आणि 7 महिने)दुप्पट होतात. काय ही किसान विकास पत्र योजना आणि त्यासाठीचे नियम अटी काय आहेत याबाबतची माहिती आपण जाणून घेऊयात.
1 एप्रिल पासून व्याजदरात वाढ-
किसान विकास पत्र (KVP) ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक-वेळ गुंतवणूक योजना आहे. ही योजना देशातील सर्व पोस्ट ऑफिस आणि मोठ्या बँकांमध्ये गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मिळणार निश्चित कालावधीतील परतावा हा दुप्पट आहे. दरम्यान 2023-24 या आर्थिक वर्षात 1 एप्रिलपासून सरकारने पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्कीमच्या व्याजदरात वाढ केली आहे. या अंतर्गत, किसान विकास पत्रावरील व्याज वार्षिक 7.2% वरून 7.5% पर्यंत वाढविण्यात आले आहे.
पूर्वीपेक्षा कमी वेळेत दुप्पट परतावा-
यापूर्वी किसान विकास योजनेचा दुप्पट परतावा मिळण्यासाठी कालावधी हा 10 वर्ष 4 महिने इतका होता. मात्र 1 एप्रिलपासून सरकारने पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्कीमच्या व्याजदरात वार्षिक 7.2% वरून 7.5% पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दुप्पट परतावा मिळवण्याचा कालावधी कमी झाला आहे. आता तुम्हाला केवळ 9 वर्ष आणि 7 महिन्यात दुप्पट परतावा मिळणार आहे.
गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा नाही-
किसान विकास पत्र योजना (KVP योजना) ही खासकरून शेतकऱ्यांसाठी बनवली आहे. यामुळे शेतकर्यांचे दीर्घकालीन पैसे वाचण्यास मदत होईल. योजनेतील किमान गुंतवणूक 1000 रुपये आहे. तसेच यामध्ये कमाल गुंतवणुकीसाठी देखील मर्यादा नाहीत. तसेच या योजनेअंतर्गत कितीही खाती उघडता येतात. तसेच या योजनेसाठी संयुक्त खाते देखील उघडता येते. तसेच या योजनेमध्ये यामध्ये वारसदार नोंद करू शकता. यासह या योजनेची पुढील काही वैशिष्ठे आहेत.
- 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले त्यांच्या स्वतःच्या नावाने KVP खाते उघडू शकतात.
- पालक अल्पवयीन किंवा अस्वस्थ मनाच्या व्यक्तीच्या वतीने खाते उघडू शकतात.
- वित्त मंत्रालयाने विहित केलेल्या मुदतीमध्ये ठेव परिपक्व होईल(खाते उघडल्याच्या तारखेपासून)
- तुमची ही ठेव तुम्ही तारण देऊ शकता.
मूदतपूर्व खाते बंद करायचे असल्यास-
- खालील अटींच्या अधीन राहून केव्हीपी मुदतीपूर्वी कधीही बंद केले जाऊ शकते
- खाते धारक अथवा संयुक्त खात्यातील कोणत्याही किंवा सर्व खातेदारांच्या मृत्यूनंतर
- राजपत्रित अधिकारी असल्याने तारणधारकाने मुदतपूर्व बंद केल्यावर.
- न्यायालयाने आदेश दिल्यावर.
- जमा केल्याच्या तारखेपासून 2 वर्षे आणि 6 महिन्यांनंतर.
ही योजना ज्या लोकांना पुरेशा बचतीसह त्यांचे भविष्य सुरक्षित करायचे आहे. त्यांच्यासाठी गुंतवणुकीचा एक विश्वासहार्य आणि चांगला पर्याय आहे. तसेच अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांना स्टॉक मार्केट, बाँड्स इत्यादी जोखमीच्या मार्गांमध्ये पैसे गुंतवण्याची भीती वाटते. त्यांच्यासाठी KVP सारख्या योजना उत्तम पर्याय आहेत. कारण त्या परताव्याच्या दृष्टीने फायदेशीर आणि सुरक्षित आहेत.