Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC New Endowment Plus Plan: एलआयसीच्या न्यू एंडोमेंट प्लस प्लॅन बाबत जाणून घ्या

LIC New Endowment Plus Plan

Image Source : www.relakhs.com

LIC Plan: जर तुम्हाला अशा योजनेत गुंतवणूक करायची असेल, ज्यामध्ये तुम्हाला कमी गुंतवणुकीवर जास्त नफा मिळेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. LIC New Endowment Plus पॉलिसीमध्ये तुम्हाला बचत आणि विमा पर्यायांचा दुहेरी लाभ मिळतो. एलआयसी न्यू एंडोमेंट प्लस ही एक नियमित प्रीमियम आणि नॉन-पार्टिसिपेटिंग विमा योजना आहे.

LIC New Endowment Plus Plan: LIC New Endowment Plus ही एक युनिट-लिंक्ड, नियमित प्रीमियम आणि नॉन-पार्टिसिपेटिंग विमा योजना आहे, जी पॉलिसीधारकाला बचत आणि विमा पर्यायांचे दुहेरी फायदे देते. ही योजना पॉलिसीधारकाला सुरक्षितता आणि दीर्घकालीन बचत यांचे उत्तम संयोजन प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती.

नवीन प्लॅनचे फायदे

पॉलिसीधारक केवळ पॉलिसीच्या मॅच्युरिटी कालावधीपर्यंत ऑनलाइन पेमेंट मोडद्वारे वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक अंतराने नियमितपणे प्रीमियम भरू शकतो. वार्षिक, सहामाही किंवा त्रैमासिक प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा वाढीव कालावधी दिला जातो. तर, देय तारीख चुकल्यास मासिक प्रीमियमसाठी 15 दिवसांचा वाढीव कालावधी या प्लॅनमध्ये दिला जातो.

वयोमर्यादा काय आहे?

LIC ची नवीन एंडोमेंट प्लस योजना खरेदी करण्याची किमान वयोमर्यादा ९० दिवस आहे. तर, कमाल वयोमर्यादा 50 वर्षे आहे. पॉलिसीच्या मॅच्युरिटीसाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 60 वर्षे आहे. 

डेथ बेनिफिट

पॉलिसीधारकाचा रिस्क कव्हर सुरू होण्याच्या तारखेपूर्वी मृत्यू झाल्यास, एकूण फंड मूल्य नामनिर्देशित व्यक्तीला दिले जाते. तर, रिस्क कव्हर सुरू झाल्याच्या तारखेनंतर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, एकूण भरलेल्या प्रीमियमच्या 105%  किंवा  वार्षिक प्रीमियमच्या 10 पट किंवा निव्वळ निधी मूल्य यापैकी जी रक्कम जास्त भरते, ती दिल्या जाते.

काय होता जुना प्लॅन

या योजनेअंतर्गत, पॉलिसीधारकाला बाँड, सिक्युरिटी, बॅलन्स्ड आणि ग्रोथ फंड अशा चार गुंतवणूक फंडांमधून निवडण्याचा पर्याय आहे. जुनी एंडोमेंट प्लस योजना (टेबल क्र. 835), जी 2015 मध्ये सुरू झाली. ती LIC ने 1 फेब्रुवारी 2020 रोजी ते बंद केली आणि एक नवीन एंडोमेंट प्लस योजना (टेबल क्र. 935) सादर करण्यात आली आहे.