Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mobile insurance Claim : मोबाईल फोनच्या विम्याचा दावा कसा करायचा?

Mobile insurance Claim : मोबाईल फोनच्या विम्याचा दावा कसा करायचा?

Image Source : www.gettyimages.ca

तुम्हाला मोबाईल विमा पॉलिसीच्या सहाय्याने मोबाईल चोरी झाल्यास, हरवल्यास, अपघातामध्ये फुटल्यास, सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यास, तसेच बॅटरीचा स्फोट होणे यासह अनेक कारणांसाठी विमा संरक्षण मिळते. मात्र, मोबाईल विमा दाखल करण्यासाठी तुम्हाला योग्य ती प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

अत्याधुनिक फिचर्समुळे मोबाईलच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. तर दुसरीकडे असे महागडे फोन चोरी होण्याच्या घटनाही वाढताना दिसून येत आहेत. तसेच मोबाईल हाताळत असताना अपघाताने तो फुटण्याचे, पाण्यात भिजण्याचे, अथवा तांत्रिक बाबींमुळे खराब होण्याचा धोका तुम्हाला मोठ्या आर्थिक खर्चात टाकू शकतो. त्यामुळेच अशा मोबाईलसाठी अनेक मोबाईलधारक विमा उतरवण्याला पसंती देत आहेत. मात्र, मोबाईल विमा काढल्यानंतर दुर्दैवाने मोबाईल फुटला, हरवला अथवा चोरी झाल्यास त्याच्या विमाच्या दावा कसा (Mobile insurance Claim) करायचा? याबाबतची माहिती आज आपण जाणून घेऊयात..

मोबाइल इन्शूरन्स मध्ये तुम्हाला मिळणारे कव्हरेज

मोबाईल विमा कंपन्याकडून पॉलिसी धारकास सर्वसमावेशक असे मोबाईलच्या नुकसानीपासून संरक्षण मिळते. तुम्ही एखाद्या महागडा फोन खरेदी केला आणि तो काही दिवसातच चोरी झाला अथवा त्याचे नुकसान झाला तर. तुम्हाला मोबाईल विमा पॉलिसीच्या सहाय्याने मोबाईल चोरी झाल्यास, हरवल्यास, अपघातामध्ये फुटल्यास, सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यास, तसेच बॅटरीचा स्फोट होणे यासह अनेक कारणांसाठी विमा संरक्षण मिळते. मात्र, मोबाईल विमा दाखल करण्यासाठी तुम्हाला योग्य ती प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. तसेच विमा क्लेम करण्यासाठी तुम्ही पुढील काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

विमा क्लेम कसा कराल?

मोबाईल विमा दावा करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही संबंधित विमा कंपनी अथवा कंपनीच्या विमा प्र्तिनिधीला कोणत्या कारणासाठी विमा दावा दाखल करायचा आहे, याची माहिती देणे आवश्यक आहे. त्यानंतर लगेचच विमा कंपनीकडून विम्याचा दावा करण्यासाठी आवश्यक ती अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि विमा दाव्याचा अर्ज वेळेत दाखल करावा.

आवश्यक कागदपत्रे

तुमचा मोबाईल खराब झाला, हरवला किंवा चोरीला गेल्यास तुम्हाला विम्याचा दावा करण्यासाठी मोबाईल खरेदीचा पुरावा म्हणून पावती. मोबाईलचा आयएमईआय (IMEI) क्रमांक, यासह तुमचा विमा पॉलिसी क्रमांक, जर मोबाईल हरवला अथवा चोरीला गेला असल्यास तुमच्याकडे तुम्ही फोन वापरत असल्याचा पुरावा. तसेच मोबाईल हरवला अथवा चोरी झाल्यास पोलिसांकडे केलेल्या तक्रारीची प्रत (FIR) आवश्यक आहे. तुम्ही मोबाईल चोरी अथवा हरवल्याची तक्रार घटना घडल्यानंतर 24 तासांच्या आत करणे आवश्यक आहे.