Agricultural Mortgage Loan : सन 1990-91 पासून कृषी पणन मंडळाद्वारे शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिक गाव पातळीवर शेतीतून निघालेला शेतमाल साठवणुकीसाठी पुरेशा सुविधा नसतात. त्यामुळे शेतीमालाचे काढणी नंतरच्या हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतीमाल बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन येतात. त्याच वेळेला सर्वांचे शेतमाल एकत्र आल्याने शेतमालाचे बाजार भाव खाली येतात.
शेतकऱ्यांना शेतमाल साठवणून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास, त्या शेतमालास जास्त बाजार भाव मिळू शकतो आणि शेतकऱ्याला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. यासाठीच जेणेकरून शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव आणि नफा मिळावा, या दृष्टीकोनातून विचार करून शेतकरी तारण कर्ज योजना राज्यात राबविण्यात येत आहे.
कोणत्या शेतमालाचा समावेश आहे ?
शेतमाल तारण कर्ज योजने अंतर्गत कर्जासाठी मूग, गहू, बेदाणा,उडीद, सोयाबीन, चना, तूर, भात (धान), करडई, ज्वारी, सूर्यफूल, बाजरी, मका, काजू बी, हळद या शेतमालाचा समावेश करण्यात आलेला आहे. ही योजना बाजार समित्यांमार्फत राबविली जाते. 6 महिन्यांच्या आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना व्याज दारात 3 टक्के सवलत देण्यात येते.
शेतमालाचे प्रकारानुसार तारण कर्जाची मुदत व व्याजदर
सुर्यफूल, सोयाबीन, तुर, उडिद, भात , करडई, मुग, हळद, चना या प्रकारच्या शेतमालाला कर्ज वाटपाची मर्यादा प्रत्यक्ष बाजारभावानूसार एकूण किंमतीच्या 75 टक्के असते. परतफेड करण्यासाठी मुदत 6 महिने आणि व्याज दर 6 टक्के असते.
मका, ज्वारी, गहू, बाजरी या प्रकारच्या शेतमालाला कर्ज वाटपाची मर्यादा एकूण किंमतीच्या 50 टक्के असते. परतफेड कालावधी 6 महिने आणि व्याजदर 6 टक्के असते.
शेतमाल तारण कर्ज योजनेत लागू असलेल्या अटी
- या कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचाच शेती माल स्वीकारला जाणार आहे.
- या योजनेचा लाभ फक्त शेतकरी घेऊ शकतात.
- शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत व्यापाऱ्यांचा माल स्वीकारला जात नाही.
- शेतकऱ्याने तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही त्यादिवसाचे चालू बाजारभाव किंवा…
- शासनाने जाहीर केलेली खरेदी किंमत यापैकी जी कमी असेल, ती ठरविण्यात येते.
- कर्जासाठी तारण ठेवलेल्या शेतमालाचा विमा उतरविण्याची जबाबदारी ही त्या संबंधित बाजार समितीची असणार आहे.