5 ways To Get Instant Loan : आजकाल ना कोणाकडून पैसे घेणे सोपे आहे, ना बँकेकडून लोन घेणे. जर तुम्ही देखील अशाच कुठल्या समस्येत अडकले असाल, तर तुम्ही इतर मार्गांचा अवलंब करु शकता. जसे की, क्रेडिट कार्ड वरुन कर्ज घेणे, क्रेडिट ॲप वरुन कर्ज घेणे, सॅलरी स्लिप शो करुन कर्ज घेणे, इन्स्टंट लोन ॲप वरुन कर्ज घेणे, पेटीएम वरुन कर्ज घेणे. या पाच मार्गांचा अवलंब केल्यास तुम्हाला लवकरात लवकर लोन मिळून, तुमचे अडलेले काम पूर्ण होऊ शकते.
Table of contents [Show]
क्रेडिट कार्डवर कर्ज घ्या
तुमच्याकडे क्रेडिट कार्ड उपलब्ध असल्यास, तुम्हाला कर्ज मिळणे सहज शक्य होईल. अनेक बँका क्रेडिट कार्डवर सहज कर्ज देतात. यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खात्यातील ऑनलाईन क्रेडिट कार्ड पर्यायावर जावे लागेल आणि तुम्हाला किती कर्ज मिळू शकते ते एकदा चेक करावे लागेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही कस्टमर केअर नंबरवर जाऊन कर्जाबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर तुम्हाला क्रेडिट कार्डवरुन लोन घेतांना जास्त अडचणी येणार नाहीत.
सॅलरी स्लिप शो केल्यास कर्ज मिळेल
तुम्ही नोकरी करत असाल, तर तुम्ही तुमच्या पगारावर देखील कर्ज घेऊ शकता. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला पैशांची गरज असेल, तेव्हा तुमच्या सॅलरी अकाउंटवर जा आणि कर्जाची मर्यादा (Loan Limit) तपासा. याद्वारे तुम्हाला अवघ्या काही दिवसांमध्ये कर्ज सहज मिळेल. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल, तर काही तासातच तुम्हाला बँक कर्ज उपलब्ध करुन देईल.
क्रेडिट ॲप
क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांसाठी क्रेडिट ॲपमध्ये अनेक सुविधा असतात. याद्वारे तुम्ही कर्जही घेऊ शकता. क्रेडिट ॲप वापरणाऱ्यांना क्रेडिट कॅशच्या पर्यायामध्ये कर्जाचा पर्यायही दिसेल. त्या पर्यायावर जाऊन तुम्ही लोन करीता अप्लाय करु शकता.
पेटीएम
पेटीएम आपल्या ग्राहकांना कर्ज सुविधा देखील प्रदान करते. अनेक लोक दैनंदिन व्यवहार करण्यासाठी याचा वापर करतात. पेटीएम वरून तुम्हाला किती कर्ज मिळेल? हे तुम्ही पेटीएम ॲपमध्ये तपासू शकता.
इन्स्टंट लोन ॲप
आजकाल असे अनेक ॲप्स आहेत, जे तुम्हाला झटपट कर्ज मिळवून देतात. मात्र यामध्ये तुम्हाला तुमची सर्व माहिती द्यावी लागते. कधीकधी ते धोकादायक देखील असू शकते. अशा परिस्थितीमध्ये इन्स्टंट लोन ॲपसाठी अर्ज करत असताना संशयास्पद ॲप्सच्या फंदात पडू नका. अशाप्रकारच्या लोन ॲप्सना आरबीआयकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.
तसेच आता ऑनलाईन कर्ज देणार्या ॲप्सना गुगलसोबत आरबीआय कर्ज परवाना शेअर करावा लागेल, असे गुगलने आपल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. शिवाय नोंदणीकृत बँक/NBFC ची माहिती ॲपच्या डिस्क्रिप्शनमध्ये द्यावी लागणार आहे. फक्त ॲप हेच कर्ज देणारं प्लॅटफॉर्म असल्यास तशी माहिती ॲपच्या डिस्क्रिप्शनमध्ये असायला हवी. या सर्व बाबींची पूर्तता करणाऱ्या इन्स्टंट लोन ॲपवरुनच लोनकरिता ॲप्लाय करा.