• 27 Sep, 2023 01:13

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kiwi Camara Resign: महिना तब्बल 900 कोटींचे वेतन तरीही तडकाफडकी सोडली नोकरी, या अमेरिकन CEO ची सोशल मिडियावर चर्चा

Kiwi Camara

Image Source : ww.twitter.com/Cwilsongriffin

Kiwi Camara Resign: CS Disco या कंपनीचे सीईओ असणाऱ्या किवी कमारा यांना 110 मिलियन डॉलर्सचे मासिक वेतन होते. भारतीय चलनात हे पॅकेज तब्बल 900 कोटी इतके आहे. मात्र किवी कमारा यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने कॉर्पोरेट्स क्षेत्र अवा्क झाले आहे.

दर महिन्याला तब्बल 900 कोटींचे पॅकेज, कंपनीकडून लक्झुरी सुविधा असून देखील अमेरिकेतील एका कंपनीच्या सीईओने तडकाफडकी जॉब सोडला आहे.  CS Disco कंपनीचे सीईओ किवी कमारा यांचा राजीनामा सोशल मिडियाचा ट्रेंडिग विषय बनला आहे.  (Kiwi Camara One of Highest Paid CEO in US Resign with no reason)

अ‍ॅपलच्या टीम कुकपेक्षा अधिक वेतन घेणारे 39 वर्षीय किवी कमारा यांचा अमेरिकेतील सर्वाधिक पॅकेज घेणाऱ्या टॉप 10 सीईओंच्या यादीत समावेश आहे. CS Disco या कंपनीचे सीईओ असणाऱ्या किवी कमारा यांना 110 मिलियन डॉलर्सचे मासिक वेतन होते. भारतीय चलनात हे पॅकेज तब्बल 900 कोटी इतके आहे. मात्र किवी कमारा यांनी कोणतेही कारण न देता तडकाफडकी राजीनामा दिल्याने कॉर्पोरेट्स क्षेत्र अवा्क झाले आहे. 

दरम्यान, कमारा यांच्या राजीनाम्याने अमेरिकेतील कॉर्पोरेट्समध्ये चर्चांना उधाण आले आहे. CS Disco कंपनीने कमारा यांच्या जागी स्कॉट हिल यांची अंतरिम सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. किवी कमारा यांच्या राजीनाम्या पार्श्वभूमीवर अमेरिकन शेअर बाजारात CS Disco कंपनीचा शेअर 12% घसरला होता. 

फिलपाईन्समधील मनिला शहरात राहणारे किवी कमारा यांच्या नावे हार्वड लॉ स्कुलमधून पदवी पूर्ण करणारे सर्वात तरुण विद्यार्थी असा किर्तीमान आहे. किवी कमारा यांनी वयाच्या 19 व्या वर्षी पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. सर्वात बु्द्धीमान विद्यार्थी म्हणून त्यांनी स्वताची ओळख निर्माण केली होती.

किवी कमारा यांचे पालक देखील डॉक्टर्स आहेत. त्यामुळे त्यांचे बालपण अभ्यासू वातावरणात गेले. वयाच्या 11 व्या वर्षी किवी यांनी रुमेटाईड अर्थराईट्स या सांध्याच्या दुर्धर आजारावर पर्यायी उपचार पद्धती या विषयी शोध निबंध तयार केला होता. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. 

कमारा यांच्या कुशाग्र बुद्धीमतेचा फिलपाईन्स सरकारकडून गौरव करण्यात आला आहे. फिलपाईन्स सरकारने किवी कमारा यांना 2005 मध्ये राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. त्याशिवाय कमारा यांना जोस रिझल सर्टिफिकेटने गौरवण्यात आले आहे. 

स्वत: सुरु केली होती CS Disco कंपनी

CS Disco च्या संचालक मंडाळातून बाहेर पडणारे आणि सीईओ पदाचा राजीनामा देणारे किवी कमारा यांनी वर्ष 2013 मध्ये याच कंपनीची पायाभरणी केली होती. त्यानंतर त्यांनी CS Disco ची एका बड्या लिगल फर्मला विक्री केली. कंपनी सोडताना कमारा यांनी कोणतेही कारण दिले नाही.