Is using Hotspot Harmful for Phone: सध्या वर्क फ्राॅम होम करताना विशेष करून दुर्गम भागात जेथे वाय-फाय आणि ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध नाहीत, तेथे मोबाइल हॉटस्पॉटद्वारे इंटरनेटचा वापर केला जातो. त्यासाठी घरून काम करण्यासाठी मोबाईल हॉटस्पॉट आता सामान्य झाले आहे. मात्र मोबाइल हॉटस्पॉटचा वापर करून स्वतःचेदेखील नुकसान होऊ शकते. जेणेकरून तुम्ही ही काळजी घेतली नाही. जर तुम्ही मोबाईल हॉटस्पॉट जास्त वेळ वापरत असाल तर तुमचा डेटा तर लवकर संपतोच पण स्मार्टफोनची बॅटरी देखील लवकर संपते. अशा परिस्थितीत मोबाईल हॉटस्पॉट वापरताना काय खबरदारी घेणे आवश्यक आहे, याबाबत आम्ही सांगणार आहोत.
युजर्सने कोणती खबरदारी घ्यावी (What Precautions should users Take)
सर्वप्रथम मोबाईल हॉटस्पॉट (Hotspot) वापरताना युजर्सने अनावश्यक अॅप्स बंद केले पाहिजेत, जे फोनमध्ये चालू राहतात. यामुळे चार्जिंग लवकर संपणे ही समस्या दूर होऊ शकते. जसे की, युजर्सने फोनचे लोकेशन, स्क्रीन ब्राइटनेस, नोटिफिकेशन हे बंद केले पाहिजेत. यामुळे पॉवर सेव्हिंग राहते.
युझर्सने नेहमी हॉटस्पॉट चालू ठेवू नये. काही लोक हॉटस्पॉट ऑफ करायला विसरतात ही गोष्ट मोठया प्रमाणावर दिसते, याचा तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरी कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तसेच, तुमच्या आजूबाजूच्या डिव्हाइसद्वारे तुमचा इंटरनेट डेटा ऍक्सेस करण्याचा प्रयत्नदेखील होतो. या गोष्टीमुळे तुमचे इंटरनेट पॅक लवकर संपण्याची शक्यता असते.
मोबाइल-आधारित हॉटस्पॉट वाय-फाय पेक्षा कमी वेग देतात. अशा परिस्थितीत ब्रॉडबँडची सुविधा उपलब्ध असेल, तर त्याचा वापर करावा. जेणेकरून तुमच्या कामात अडथळा येणार नाही व तुमचे काम सुरळित व वेळेत होईल. मोबाईल आधारित हॉटस्पॉट जास्त काळ वापरु नये. हे वाय-फाय आणि ब्रॉडबँडपेक्षा खूप महाग आहे. तसेच हॉटस्पॉटमुळे इंटरनेटची स्पीड ही स्लो होते. यावर उपाय म्हणून ब्रॉडबँडच्या माध्यमातून कमी रुपयांच्या रिचार्जमध्ये हाय स्पीड तुम्हा मिळवता येईल.