कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना, माय नेम इज खान, स्टुडंट ऑफ द ईयर, बॉम्बे टॉकीज, ये दिल है मुश्किल आणि त्यानंतर आता 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा चित्रपट दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे. हा चित्रपट शुक्रवारी 28 जुलै 2023 रोजी देशभरातील संपूर्ण सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात आलिया भट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
या चित्रपटाचे कथानक इशिता मोईत्रा आणि शशांक खेतान यांनी लिहिले असून धर्मा प्रोडक्शन (Dharma Production) तर्फे हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या निमित्ताने चित्रपटाचे बजेट आणि पहिल्या दिवसाची बॉक्स ऑफिसवरील कमाई याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
ओपनिंग डे ची कमाई जाणून घ्या
दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) त्याच्या चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असतो. सध्याही तो चर्चेत असण्याचे कारण म्हणजे 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'. या चित्रपटांमध्ये रणवीर सिंग (Ranveer Singh), आलिया भट (Alia Bhatt), जया बच्चन (Jaya Bachchan), शबाना आजमी (Shabana Azmi) आणि धर्मेंद्र देओल (Dharmendra Deol) यासारख्या दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट शुक्रवारी देशभरातील संपूर्ण सिनेमागृहात प्रदर्शित झाला.
ओपनिंग डे च्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटने (Sacknilk Entertainment) दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाने ओपनिंग डे ला 11.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चांगली कमाई केल्यामुळे वीकेंडला चित्रपट आणखी उत्तम कमाई करेल, असा अंदाज बांधण्यात येत आहे. या चित्रपटाला अनेक समीक्षकांनी सर्वाधिक रेटिंग दिले आहे. याशिवाय बऱ्याच दिवसानंतर बॉलीवूडमध्ये उत्तम आशयाचा चित्रपट पाहायला मिळत असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.
चित्रपटाचे बजेट जाणून घ्या
धर्मा प्रोडक्शनचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट 160 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये (budget) तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या वितरणाचे हक्क वायकॉम 18 स्टुडिओला (Viacom 18 Studio) देण्यात आले आहेत. तसेच या चित्रपटाला संगीत प्रीतम चक्रवर्ती (Pritam Chakraborty) यांनी दिले आहे. या चित्रपटातील गाणी सध्या सोशल मीडियाच्या ट्रेंड होताना पाहायला मिळत आहेत.