Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

YouTube Partner Program मध्ये सहभागी व्हा आणि कमवा लाखो रुपये घर बसल्या…

YouTube Partner Program

तुम्ही पात्रता निकष पूर्ण केल्यानंतर, तुम्ही युट्युब पार्टनर प्रोग्रामसाठी (YPP) अर्ज करू शकता. जोपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करणार नाही तोवर तुम्हांला कुठलाही मोबदला मिळणार नाही हे लक्षात असू द्या. YPP मध्ये सामील होऊन पैसे कमावण्यासाठीतुम्हाला तुमचे YouTube चॅनल Google AdSense खात्याशी जोडणे आवश्यक आहे.

तुम्ही जर YouTube वरून कमाई करण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुम्ही संपूर्ण वाचलाच पाहिजे. जेणेकरून तुम्हांला युट्यूब कसे काम करते आणि त्यांच्या युजर्सला, कंटेट क्रीयेटरला कसा महसूल मिळवून देते हे लक्षात येईल.

YouTube च्या माध्यमातून कमाई कशी करायची, त्यासाठीचे मॉडेल काय, या सगळ्यांची चर्चा या लेखात आपण करणार आहोत. याबाबतचे काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे:

YouTube चॅनल तयार करा

सर्वात महत्वाची आणि पहिली पायरी म्हणजे YouTube चॅनल सुरु करणे. तुमच्या Google खात्यात साइन इन करा आणि YouTube वर नेव्हिगेट करा. तिथे "Create Channel" वर क्लिक करा आणि तुमचे चॅनल सेट करण्यासाठी सूचनांचे अनुसरण करा.त्यांनतर तुमचा स्वतःचा YouTube चॅनल सुरु होईल.

कंटेट तयार करा आणि अपलोड करा

तुम्हांला ज्या विषयावर व्हिडियो बनवायचे आहेत त्यासाठीची पूर्वतयारी करा. यासाठी आवश्यक ती माहिती मिळवा, त्याचे सादरीकरण करा आणि  व्हिडिओ शूट करा. गुणवत्तापूर्ण, माहितीपूर्ण आणि आकर्षक असे व्हिडियो बघणे लोकांना आवडते, हे लक्षात घ्या. तुमचे व्हिडियो लोकांनी वारंवार पाहिले पाहिजेत, जेणेकरून तुम्हांला अधिक कमाई करता येईल. यासाठी कंटेट च्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्या.

कधी सुरु होईल कमाई?

YouTube च्या माध्यमातून कमाईला सुरुवात करण्‍यासाठी, तुमच्‍या चॅनेलने काही पात्रता निकष पूर्ण करणे आवश्‍यक आहे. युट्युब इंडियाच्या माहितीनुसार तुमच्या चॅनलचे किमान 1,000 सदस्य असणे आवश्यक आहे. याशिवाय गेल्या 12 महिन्यांत 4,000 वॉच आवर्स (Watch Hours) असायला हवेत. हे दोन निकष पूर्ण केल्यानंतर तुम्ही पैसे कमावण्यास पात्र असाल.

युट्युब पार्टनर प्रोग्राम ( YouTube Partner Program )

तुम्ही पात्रता निकष पूर्ण केल्यानंतर, तुम्ही युट्युब पार्टनर प्रोग्रामसाठी (YPP) अर्ज करू शकता. जोपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करणार नाही तोवर तुम्हांला कुठलाही मोबदला मिळणार नाही हे लक्षात असू द्या. YPP मध्ये सामील होऊन पैसे कमावण्यासाठीतुम्हाला तुमचे YouTube चॅनल Google AdSense खात्याशी जोडणे आवश्यक आहे. एकदा की तुमचे खाते Google AdSense खात्याशी तुम्ही जोडले, की त्यांनतर तुम्हांला तुमच्या YouTube चॅनलशी संबंधित सर्व माहिती, महसूल आदी विषयाची माहिती पुरवण्यात येईल.

तुमच्या व्हीडीयोची गुणवत्ता, विषय यानुसार तुम्हांला गुगलद्वारे जाहिराती प्रदान केल्या जातील. जाहिरातीमधून मिळणारा महसूल युट्युबच्या पॉलिसीनुसार नोंदणीकृत बँक खात्यात जमा करण्यात येतो.

जाहिरात महसूल

तुम्ही YPP साठी अर्ज केल्यानंतर काही दिवसांत त्यावर युट्युबकडून कारवाई केली जाते. या योजनेत तुम्ही सामील झाल्यानंतर तुम्‍ही तुमच्‍या व्हिडिओंवर जाहिराती सक्षम (Enable) करून कमाई करू शकता. YouTube तुमच्या व्हिडिओंच्या आधी, व्हिडिओंच्या दरम्यान किंवा व्हिडिओंच्या नंतर जाहिराती दाखवतात. या जाहिरातीतून कमावलेला सुमारे 55% महसूल कंटेट क्रियेटरला दिला जातो तर 45% महसूल YouTube घेत असते.