इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ एम्प्लॉयर्स (IOE) चे सरचिटणीस रॉबर्टो सुआरेझ सँटोस (Roberto Suárez Santos) यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच Artificial Intelligence बद्दल एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून AI बद्दल उलटसुलट चर्चा सुरु आहेत. अशातच आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे रोजगाराच्या बाबतीत होत असलेल्या बदलांकडे नकारात्मक न बघता रचनात्मक दृष्टीकोनातून बघणे गरजेचे आहे असे ते म्हणाले आहेत. AI मुळे कर्मचाऱ्यांचे जॉब्स जातील अशी जी काही चर्चा सुरु आहे, त्यावर रॉबर्टो यांनी भाष्य केले आहे.
ते म्हणाले की, एआयसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन कर्मचार्यांसाठी नवीन संधी कशा निर्माण करता येतील हे पाहणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या काळात संगणकाला देखील असाच विरोध केला गेला, परंतु आता संगणक ही आपली गरज बनली आहे आणि त्यामुळे अधिक रोजगार उपलब्ध झाले आहेत. AI च्या बाबतीत देखील असे घडू शकेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
An Interactive Session with Mr. Roberto Suarez Santos, SG, IOE was held today at FICCI & SCOPE office. Representatives from FICCI & Constituents of Council of Indian Employers - AIOE, SCOPE & EFI were present in the session. @ficci_india @PSUSCOPE @ioevoice @arvindafrancis pic.twitter.com/bJMfaHKKEm
— All India Organisation of Employers (@AlOE__India) July 19, 2023
हा या संदर्भात रचनात्मक दृष्टिकोन आहे. येत्या काही दिवसांत बहुतांश पारंपरिक कामे लोप पावणार नाहीत, हे लक्षात ठेवावे लागेल, असे सांतोस इंदूरमध्ये म्हणाले. पण AI सारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे ते करण्याची पद्धत नक्कीच बदलेल. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ एम्प्लॉयर्स (IOE) चे सरचिटणीस रॉबर्टो सुआरेझ सँटोस हे सध्या भारत भेटीवर आले आहेत. इंदूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
कौशल्य विकास महत्वाचा
‘उद्योगाचे भविष्य, कौशल्य विकास आणि गतिशीलता’ या विषयावरील B20 परिषदेत सहभागी होण्यासाठी सॅंटोस भारतात आले आहेत. B20 (Business 20) हे G20 समुहाचाच एक भाग आहे, जो उद्योग जगताशी संबंधित धोरणावर काम करतो.
AI सारख्या तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या जगात होत असलेल्या बदलांकडे पुराणमतवादी विचाराने पाहिले जाऊ नये असे ते म्हणाले. तसेच AI चा वैयक्तिक स्तरावर काम करणाऱ्या व्यावसायिक आणि कर्मचाऱ्यांना नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपयोग जर केला तर कार्यक्षमता वाढू शकते असेही ते म्हणाले. यासाठी खरे तर आता सर्वांनीच AI बद्दल आपले ज्ञान वाढवले पाहिजे आणि स्वतःचा कौशल्य विकास करून घेतला पाहिजे.
आपण प्रगतीशील दृष्टीकोन ठेऊन जर काम केले तर येणाऱ्या काळात उद्योगधंद्यात तेजी पहायला मिळेल आणि त्यायोगे आपली अर्थव्यवस्था देखील सुदृढ बनू शकते असे त्यांनी म्हटले आहे.