रिलायन्स जिओने शिलाँग, इंफाळ, एझॉल, आगरतळा, इटानगर कोहिमा व दिगापूर या सात शहरांना जिओ 5G नेटवर्कने जोडून, ईशान्येकडील सहा राज्यांमध्ये ट्रू 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली. रिलायन्स जिओने आश्वासन दिले की फेब्रूवारी 2023 पर्यंत जिओ ट्रू 5G सेवा ईशान्येकडील प्रत्येक राज्य व शहरात उपलब्ध
करून दिली जाईल.
27 जानेवारीपासून, अरुणाचल प्रदेश (इटानगर), मणिपूर(इंफाळ), मेघालय (शिलाँग), मिझोरम (एझॉल),नागालँड (कोहिमा आणि दिमापुर) आणि मिजोरम (आगरतळा)या 6 राज्यांतील 7 शहरातील वापरकर्त्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. एकदा नोंदणी केल्यानंतर वापरकर्ते कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 1GBPS+ इतक्या वेगाने अमर्यादित डेटा मिळवू शकतात.
या प्रसंगी जिओचे प्रवक्ते म्हणाले "जिओ आजपासून देशातील ईशान्य भागात ट्रू 5G ही सेवा सुरू करण्याची घोषणा करत आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे लोकांसाठी विशेषतः आरोग्य सेवेच्या क्षेत्रात विश्वसनीय वायरलेस नेटवर्कसह महत्वपूर्ण फायदा होईल. याव्यतिरिक्त ते कृषि, शिक्षण, ई- गव्हर्नन्स , आयटीईशान्ये, एसएमई, ऑटोमेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गेमिंग आणि इतर काही क्षेत्रांसाठी फायदेशीर ठरेल. जिओ ट्रू 5G बीटा लाँचच्या 4 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 191 शहरात पोहोचेल.
या राज्यांमध्ये सुरू होणार ट्रू 5G सेवा
या आठवड्याच्या सुरुवातीला रिलायन्स आजपर्यंतचा सर्वात मोठा ट्रू 5G रोल आऊट जाहीर केला. या नेटवर्कने नुकतीच 50 शहरांची यादी जाहीर केली आहे. येथे लवकरच ट्रू जिओ 5G सेवा सुरू होणार आहे.सहा ईशान्येकडील राज्यांव्यतिरिक्त, रिलायन्स जिओ ट्रू 5G आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगढ,गोवा, हरियाणा, झारखंड, कर्नाटक केरळ, महाराष्ट्र, ओडीसा, पद्दुचेरी, पंजाब,राजस्थान, तामिळनाडू,तेलंगणा, पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.