• 08 Jun, 2023 01:44

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jio Fiber Monthly Plan: संपूर्ण कुटुंबाला लुटता येईल अनलिमिटेड इंटरनेटचा आनंद, जाणून घ्या जिओ फायबरचा मासिक प्लॅन

Jio Fiber Monthly Plan

Jio Fiber Monthly Plan: ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन रिलायन्स कंपनीने (Reliance Company) जिओ फायबर प्लॅन संपूर्ण कुटुंबासाठी आणला आहे. या प्लॅनचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना ब्रॉडबँड कनेक्शन घ्यावे लागणार आहे. जिओ फायबरच्या अनलिमिटेड इंटरनेटचा आनंद घेण्यासाठी ग्राहकांना मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर रिचार्ज करावा लागेल. आज आपण मासिक प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

कोविड महामारी दरम्यान भारतात मोठ्या प्रमाणावर वर्क फ्रॉम होम (WFH) संकल्पना रुजली. आजच्या घडीला भारतात कोविड कमी झाला असला, तरीही अनेक कंपनीनी आता कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापर वाढला असून त्याचे दरही वाढले आहेत. सर्वसामान्य लोकांना परवडतील असे इंटरनेटचे प्लॅन तयार करणे सध्याची गरज बनली आहे. लोकांची हीच गरज लक्षात घेऊन जिओ कंपनीने हाय स्पीड इंटरनेट प्लॅन सुरू केला आहे. हा प्लॅन एका व्यक्तीसाठी नसून संपूर्ण परिवाराला याचा वापर करता येणार आहे. जिओ फायबरच्या मासिक प्लॅनची किंमत, इंटरनेट स्पीड आणि वैधता याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

जिओ फायबर 399 रुपयांचा प्लॅन

जिओ फायबरच्या 399 रुपयांचा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह ग्राहकांना मिळणार आहे. या प्लॅनमधील इंटरनेट स्पीड 30Mbps असून यावर ग्राहकांना GST भरावा लागणार आहे. जीएसटीची रक्कम पकडून हा प्लॅन 440 रुपयांना खरेदी करता येईल.

जिओ फायबर 699 रुपयांचा प्लॅन

699 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 30 दिवसांची वैधता मिळत आहे. मात्र या प्लॅनमधील इंटरनेट स्पीड हा 30Mbps ऐवजी 100Mbps मिळणार आहे. यामध्ये ग्राहक अनलिमिटेड इंटरनेटचा आनंद घेऊ शकतात. या प्लॅनवर देखील GST भरावा लागणार आहे.

जिओ फायबर 999 रुपयांचा प्लॅन

जिओ फायबरच्या 999 रुपयांच्या या प्लॅनची वैधता 30 दिवसांची असून यामध्ये 150Mbps इंटरनेट स्पीड देण्यात आला आहे. याशिवाय Prime Video, Disney Hotstar, Voot, Sony Live, Zee5 याशिवाय इतर 11 प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला अनलिमिटेड इंटरनेटचा आनंद घेता येणार आहे. या प्लॅनवर देखील ग्राहकांना GST भरावा लागणार आहे.

जिओ फायबर 1499 रुपयांचा प्लॅन

30 दिवसांच्या वैधतेसह जिओ 1499 रुपयांमध्ये आणखी एक प्लॅन ग्राहकांसाठी घेऊन आले आहे. यामध्ये 300Mbps इंटरनेट स्पीड देण्यात येत आहे.याशिवाय Prime Video, Disney Hotstar, Voor, Sony Live, Zee5 याशिवाय इतर 11 प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे. या प्लॅनवर देखील ग्राहकांना GST भरावा लागणार आहे.

जिओ फायबर कनेक्शनसाठी किती चार्जेस घेतले जातात?

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी रिलायन्सचे ब्रॉडबँड कनेक्शन घरामध्ये लावावे लागणार आहे. जिओ फायबरमुळे हाय स्पीड इंटरनेटची सुविधा मिळते. याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना 1500 रुपयांचे सिक्युरिटी चार्ज (security charge) भरावा लागणार आहे. जर तुम्हाला हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन पसंत नाही पडले, तर तुम्ही हे कनेक्शन काढून 1500 रुपये परत मिळवू शकता. जर तुम्हाला जिओ फायबरची सुविधा आवडली तर तुम्ही अनलिमिटेड इंटरनेटचा फायदा घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिकआधारावर रिचार्ज करावा लागणार आहे.