• 09 Feb, 2023 07:52

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jio 5G आता आणखी 50 शहरांमध्ये सेवा देणार, तुमचं शहर या लिस्ट मध्ये आहे का? चेक करा!

5G

भारतात काही दिवसांपूर्वी 5G नेटवर्क सेवा सुरू करण्यात आली आहे. 5G सेवांच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लॉन्चमध्ये, रिलायन्स जिओने (Reliance Jio) आज 50 शहरांमध्ये तिची Jio True 5G सेवा सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. याआधी, Jio 5G सेवा देशातील 184 शहरांमध्ये उपलब्ध आहे.

Reliance Jio ने म्हटले आहे की या 50 शहरांमधील Jio वापरकर्त्यांना त्यांच्या डिव्हाइसवर 5G सेवा वापरण्यास सुरुवात करण्यासाठी Jio वेलकम ऑफरसाठी (Jio Welcome Offer) आमंत्रित केले जाईल. Jio True 5G कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 1 Gbps+ पर्यंत स्पीडवर ग्राहकांना अमर्यादित डेटा ऑफर करत आहे.

या विषयी अधिक माहिती देताना, जिओच्या प्रवक्त्याने सांगितले की, " देशातील 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 50 अतिरिक्त शहरांमध्ये Jio True 5G सेवा लाँच करताना आम्हांला आनंद होत आहे. आज देशभरात Jio True 5G सेवा एकूण 184 शहरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगात कुठेही 5G सेवांच्या रोलआउट्सपैकी (5G Rollout) ही एक सर्वात मोठी सेवा आहे. आम्ही देशभरात True 5G रोलआउटची गती आणि तीव्रता वाढवली आहे.  2023 या वर्षात प्रत्येक Jio वापरकर्त्याने Jio True 5G तंत्रज्ञानाच्या नेटवर्क सेवांचा लाभ घ्यावा अशी आमची इच्छा आहे."

डिसेंबर 2023 पर्यंत Jio True 5G सेवा देशभरात उपलब्ध करून देण्याचा आमचा विचार आहे असेही कंपनीने म्हटले आहे. आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गोवा, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पुद्दुचेरी पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे Reliance Jio ने आभार मानले आहे. या राज्यांनी डिजिटायझेशनच्या प्रक्रियेत आम्हांला शक्य ती सर्व मदत केल्याचे कंपनीने म्हटले आहे.

आजपासून Jio 5G सेवा प्राप्त करणार्‍या 50 शहरांची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे:

 • चित्तूर, आंध्र प्रदेश
 • कडप्पा, आंध्र प्रदेश
 • नरसरावपेट, आंध्र प्रदेश
 • ओंगोले, आंध्र प्रदेश
 • राजमहेंद्रवरम, आंध्र प्रदेश
 • श्रीकाकुलम, आंध्र प्रदेश
 • विझियानगरम, आंध्र प्रदेश
 • नागाव, आसाम
 • बिलासपूर, छत्तीसगड
 • कोरबा, छत्तीसगड
 • राजनांदगाव, छत्तीसगड
 • पणजी, गोवा
 • अंबाला, हरियाणा
 • बहादूरगड, हरियाणा
 • हिसार, हरियाणा
 • कर्नाल, हरियाणा
 • पानिपत, हरियाणा
 • रोहतक, हरियाणा
 • सिरसा, हरियाणा
 • सोनीपत, हरियाणा
 • धनबाद, झारखंड
 • बागलकोट, कर्नाटक
 • चिक्कमगलुरू, कर्नाटक
 • हसन, कर्नाटक
 • मंड्या, कर्नाटक
 • तुमाकुरू, कर्नाटक
 • अलप्पुझा, केरळ
 • कोल्हापूर, महाराष्ट्र
 • नांदेड-वाघाळा, महाराष्ट्र
 • सांगली, महाराष्ट्र
 • बालासोर, ओडिशा
 • बारीपाडा, ओडिशा
 • भद्रक, ओडिशा
 • झारसुगुडा, ओडिशा
 • पुरी, ओडिशा
 • संबलपूर, ओडिशा
 • पुद्दुचेरी
 • अमृतसर, पंजाब
 • बिकानेर, राजस्थान
 • कोटा, राजस्थान
 • धर्मपुरी, तामिळनाडू
 • इरोड, तामिळनाडू
 • थुथुकुडी, तामिळनाडू
 • नलगोंडा, तेलंगणा
 • झाशी, उत्तर प्रदेश
 • अलिगढ, उत्तर प्रदेश
 • मुरादाबाद, उत्तर प्रदेश
 • सहारनपूर, उत्तर प्रदेश
 • आसनसोल, पश्चिम बंगाल
 •  दुर्गापूर, पश्चिम बंगाल

Jio True 5G सेवा ही 4G नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांना दिली जाणार आहे. यासाठी ग्राहकांना त्यांच्या मोबाईलची नेटवर्क सेटिंग चेक करावी लागणार आहे. ज्या शहरांमध्ये ही सेवा दिली जाणार आहे त्या शहरातील Jio वापर कर्त्यांना कंपनीतर्फे मेसेज पाठवला जाणार आहे. रिलायन्स जिओ 700 MHz, 3500 MHz, 26 GHz बँडमध्ये 5G स्पेक्ट्रमची सेवा ग्राहकांना देणार आहे.