आयकर रिटर्न फायलिंगची प्रोसेस सुरु झाली आहे. नोकरदारांना रिटर्न फायलिंगसाठी फॉर्म 16, बँक स्टेटमेंट, फॉर्म 26AS तसेच कर वजावटीचा लाभ घेण्यासाठी स्टेटमेंट्स सादर करावे लागतात. याशिवाय इन्व्हेस्टमेंट सर्टिफिकेट, रेंट अॅग्रीमेंट, डिव्हीडंड वॉरंट सादर करावे लागते. यंदा 31 जुलै 2023 पर्यंत करदात्यांना रिटर्न फायलिंग करता येईल.
वार्षिक 2.5 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असणाऱ्या नोकरदारांना, वैयक्तिक करदात्यांना टॅक्स रिटर्न फायलिंग करणे आवश्यक आहे. आयकर विभागाच्या वेबपोर्टलवर करदात्यांना आयटीआर फायलिंग करता येते. ही प्रोसेस नेमकी कशी करावी ज्यामुळे अडचण निर्माण होणार नाही ते पाहुया.
ऑनलाईन आयटीआर फायलिंगसाठी या स्टेप्स फॉलो करा
- ई-फायलिंग पोर्टलवर युजर आयडी आणि पासवर्डने लॉगीन करा.
- तुमच्या डॅशबोर्डवर इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगवर क्लिक करा.
- आर्थिक वर्ष 2023-24 या वर्षात ऑनलाईन रिटर्न फायलिंगचा पर्याय निवडा.
- यापूर्वी तुम्ही ITR फायलिंग केले असेल आणि ते पेंडिंग दाखवत असेल तर तीच प्रोसेस तुम्ही पुन्हा करु शकता. याशिवाय तुम्ही अपूर्ण आयटीआर प्रोसेस रद्द करुन नव्याने प्रोसेस करु शकता.
- यानंतर अॅप्लिकेबल स्टेट्सची निवड करुन प्रोसेस कंटीन्यू करा.
- तुम्ही इन्कम टॅक्सच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत ती निवडायची आहे. ती निवडल्यानंतर इन्कम टॅक्स फॉर्मची निवड करा आणि प्रोसेस कंटीन्यू करा.
- इन्कम टॅक्स कॅटेगरीची निवड केल्यानंतर तुम्हाला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे त्यांची यादी समोर येईल. रिटर्न फायलिंगची प्रोसेस सुरु करावी.
- तुम्ही नवीन टॅक्स प्रणालीची निवड केली असेल तर तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशनचा पर्याय निवडावा लागेल. ते केल्यानंतर तुम्हाला किती कर भरावा लागेल याचा तपशील समोर येईल.
- यात तुम्ही जी काही माहिती सादर केली आहे ती तपासून घ्यावी. यात काही चूक असेल तर ती दुरुस्त करण्याची ही शेवटची संधी आहे.
- सर्व तपशीलाची खातरजमा केल्यानंतर तुमचे कर विवरण स्क्रीनवर दाखवले जाईल. यात कर भरावा लागत असेल पेमेंट करण्यासाठीचा पर्याय निवडावा.
- जर तुम्हाला कर भरण्याची आवश्यकता नसेल तर तुम्ही रिफंडसाठी पात्र ठरु शकता. मात्र हे जाणून घेण्यासाठी टॅक्स प्रीव्ह्यू पाहता येईल.
- टॅक्स पेमेंट केल्यानंतर तुम्हाला याबाबत एक मेसेज प्राप्त होईल. आयटीआर फायलिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्ही प्रीव्हयू रिटर्न क्लिक करुन तो पाहू शकता.
- यानंतर रिटर्नची व्हॅलिडेशनची प्रोसेस करावी लागते. ज्यात व्हॅलिडेट करुन व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे.
- तुमच्या आयटीआरचे ई-व्हेरिफिकेशन करण्याचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुमचे रिटर्न फायलिंगची प्रोसेस पूर्ण होईल.