Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR Filling Documents: यंदा पहिल्यांदाच आयकर विवरणपत्र सादर करणार आहात, जाणून घ्या कोणत्या डॉक्युमेंट्सची गरज लागते

ITR

ITR Filling Documents: आयकर विवरण पत्र (Income Tax Return) सादर करण्यासाठी दरवर्षी 31 जुलै ही अंतिम मुदत असते. आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपते. त्यानंतर नोकरदार वर्ग, व्यावसायिक कागदपत्रांची जुळवाजुळव करतात.

आर्थिक वर्ष 2022-23 ची आयकर विवरण सादर करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आयकर विभागाने ITRचे ऑनलाईन फॉर्म वेबसाईटवर उपलब्ध केले आहेत. तुम्ही जर यंदाच्या वर्षी आयकर विवरण सादर करणार असाल तर त्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात याची माहिती जाणून घेऊया.

आयकर विवरण पत्र (Income Tax Return) सादर करण्यासाठी दरवर्षी 31 जुलै ही अंतिम मुदत असते. आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपते. त्यानंतर नोकरदार वर्ग, व्यावसायिक कागदपत्रांची जुळवाजुळव करतात.

आयकर विवरणपत्र म्हणजे एका आर्थिक वर्षात आपण कमावलेले उत्पन्न, गुंतवणूक आणि खर्च यांचा ताळेबंद होय. आयकर विवरणपत्र ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. वैयक्तिक करदाते, नोकरदार आयकर विभागाच्या वेबपोर्टलवरुन थेट ITR सादर करु शकता.

पॅनकार्ड

इन्कम टॅक्स रिटर्नसाठी सगळ्यात महत्वाचा दस्त म्हणजे पॅनकार्ड आहे. टीडीएस वजावटीसाठी पॅनकार्ड सादर करणे आवश्यक आहे.  त्याचबरोबर टॅक्स रिफंडसाठी पॅनकार्ड आवश्यक असते.

आधारकार्ड

पॅनकार्ड बरोबरच आधार कार्ड देखील तितकाच महत्वाचा दस्त मानला जातो. पॅनकार्ड आधारकार्ड लिंक करण्यात आले आहे. आपण जे काही आर्थिक व्यवहार करतो त्याचा डेटा पॅनकार्डच्या माध्यमातून कळू शकतो. ITR फायलिंगवेळी आधार क्रमांकावरुन OTP येतो आणि त्यानुसार व्हेरिफिकेशन होते. त्यामुळे प्रत्येक करदात्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.

फॉर्म 16

नोकरदारांसाठी त्यांच्या कंपनीकडून फॉर्म 16 इश्यू केला जातो. यात वेतनावर वजावट करण्यात आलेल्या टीडीएसचा तपशील असतो. फॉर्म 16 हा दोन भागात असतो.  A आणि B ज्यात वर्षभरात त्या कंपनीकडून किती वेतन मिळाले, टीडीएस किती वजा केला, कर वजावट आणि इतर सवलती, भत्ते यांचा लेखाजोखा असतो. नोकरदारांसाठी इन्कमटॅक्स भरण्यासाठी फॉर्म 16 अत्यंत महत्वाचे डॉक्युमेंट्स आहे. .

फॉर्म 16A

फॉर्म 16A, फॉर्म 16B आणि फॉर्म 16C हे तीनही डॉक्युमेंट्स टीडीएसशी संबधित आहेत. वेतनाव्यतिरिक्त पेमेंट केल्यास आणि त्यावर टीडीएस वजावट झाल्यास फॉर्म 16A इश्यू केला जातो. एखद्या व्यक्तीने प्रॉपर्टीची विक्री केली तर फॉर्म 16B इश्यू केला जातो. भाड्यावर 5% टीडीएस वजा केला जातो. त्यावर फॉर्म 16C इश्यू केला जातो.

बँक खात्यांचा तपशील

आयकर विवरण सादर करताना बँक खात्याचा तपशील सादर करणे आवश्यक आहे. ITR मध्ये करदात्याला बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव IFSC कोड अशा गोष्टी सादर कराव्या लागतात. जर तुम्हाला टॅक्स रिफंड येणार असेल तर इन्कम टॅक्स विभाग तुम्हाला थेट अकाउंटला ट्रान्सफर करतो.

फॉर्म 26AS

फॉर्म 26AS मध्ये बँक, कंपी किंवा एखाद्या कंपनीकडून तुम्हाला मिळालेल्या उत्पन्नावर वजा केलेल्या टीडीएसचा तपशील असतो. तुमच्या पॅनकार्डच्या बदल्यात ज्या ज्या ठिकाणी टीडीएस वजा केला असेल त्याचा उल्लेख फॉर्म 26AS मध्ये असतो.

गृहकर्जाचे स्टेटमेंट (Home Loan Statement)

आयकरदात्यांसाठी गृहकर्जाचे स्टेटमेंट महत्वाचे मानले जाते. या स्टेटमेंटमध्ये कर्जाची मुद्दल आणि त्यावरील व्याज किती फेडले याचा तपशील असतो. ज्या बँक किंवा हाऊसिंग फायनान्स संस्थांकडून तुम्ही कर्ज घेता त्यातून तुम्ही वर्षभराचे स्टेटमेंट घेऊ शकता.

कर सवलतीसाठी केलेल्या गुंतवणुकीची सर्टिफिकेट्स

कर सवलतीसाठी तुम्ही जर मुदतठेव, ईएलएसएस अशा गुंतवणुकीची रिसिप्ट तुम्हाला सादर करावी लागेल. तरच तुम्ही कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. याशिवाय शेअर्सची विक्री, प्रॉपर्टीची विक्री करुन जर आर्थिक वर्षात तुम्ही नफा, फायदा कमावला असेल तर तुम्हाला शेअर्सचे लेजर, प्रॉपर्टी सेल डिड सादर करावे लागले.

भाडे पावती (Rent Reciept) 

तुम्हाला जर दर महिन्याला भाड्याने उत्पन्न मिळत असेल तर त्याचा तपशील तुम्हाला ITR फायलिंगवेळी द्यावा लागेल. याच्या उलट जर तुम्ही भाड्याच्या घरात राहात असाल तर तुम्हाला घर मालकाकडून भाडेपावती घेऊन ती सादर करावी लागेल.

परदेशातून उत्पन्न मिळत असल्यास...(Foreign Income)

तुम्ही नोकरीनिमित्त परदेशात काम करत असाल किंवा तुम्हाला परदेशातून उत्पन्न मिळत असेल तर त्याचा पुरावा सादर करावा लागेल. DTAA या अंतर्गत कर लाभ मिळवू शकता. परदेशी उत्पन्नाचा स्त्रोत स्पष्ट करणारी कागदपत्रे तुम्हाला संबधिक कंपनी किंवा कॉन्ट्रॅक्टरकडून सादर करावी लागतील.

लाभांशातून मिळणारे उत्पन्न (Dividend Income)

तुम्ही जर शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल आणि वर्षभरात त्यातून तुम्हाला डीव्हीडंड मिळाला असेल तर त्याचा तपशील तुम्हाला आयटीआर सादर करताना द्यावा लागेल. तुमच्या बँक खात्यात किंवा डिमॅट खात्यात डीव्हीडंड इन्कमचा तपशील मिळतो.