एक आघाडीची टेक कंपनी म्हणून itel ही कंपनी तुम्हांला माहितीच असेल. आता हो कंपनी स्मार्टफोनच्या व्यवसायात उतरली आहे. कंपनी येत्या आठवड्यात बेस्ट फीचर्स असलेला itel S23+
स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. याची तारीख देखील कंपनीने जाहीर केली आहे. येत्या 26 सप्टेंबरला हा बहुप्रतिक्षित मोबाईल लॉन्च होणार आहे.
किती असेल किंमत?
हा स्मार्टफोन 15,000 रुपयांपर्यंत उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. याआधी देखील कंपनीने काही मोबाईल बाजारात आणले आहेत. सामान्यांना परवडतील अशा दरात हे मोबाईल विकले जातात. Key Pad असलेले साधे itel मोबाईल फोन ग्रामीण भागात अजूनही खरेदी केले जातात. आता कंपनीने स्मार्ट फीचर्स देऊन परवडणाऱ्या दरात स्मार्टफोन आणला आहे.
काय असतील फीचर्स?
मिडिया रिपोर्टनुसार हा मोबाईल 6.78-इंच FHD+ 3D AMOLED डिस्प्लेसह दिला जाणार आहे. ज्याद्वारे उच्च गुणवत्तेचे व्हिडियो आणि फोटोज युजर्सला बघता येणार आहे. सोबतच कॅमेराप्रेमींसाठी या मोबाईलमध्ये खास फीचर्स असणार आहेत. 50-मेगापिक्सेल रेअर कॅमेरा आणि 32MP अल्ट्रा-क्लियर फ्रंट कॅमेरा ग्राहकांची मने जिंकेल असा कंपनीला विश्वास आहे. कंपनीने त्यांचे ग्राहक आणि त्यांची गरज या गोष्टी लक्षात ठेऊन हा मोबाईल डिझाईन केला आहे. स्मार्टफोन ऑक्टा-कोर Unisoc T616 प्रोसेसर आणि 8GB पर्यंत RAM सह येण्याची अपेक्षा आहे.
Do you want to know why the itel S23+ is the talk of the town? @victorpraiztech gives a detailed review and also advises you to get one for yourself.#itelS23Plus#ExperienceTheCurve pic.twitter.com/NzvgWhoJU4
— itel (@itelNigeria) September 22, 2023
दीर्घकाळ चालेल बॅटरी
Itel चे मोबाईल फोन दीर्घकाळ चालणाऱ्या बॅटरीसाठी ओळखले जातात. itel S23+ स्मार्टफोनमध्ये युजर्सला 5000mAh बॅटरी दिली जाणार असून मोबाईल बॅटरी जलद गतीने चार्ज होईल असे फीचर्स दिले आहेत.
याशिवाय हा मोबाईल ड्युएल सिम कार्डसह वापरता येणार आहे. तसेच फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर देखील यात देण्यात आला आहे.