Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

WhatsApp spam calls: फेक कॉलप्रकरणी केंद्र सरकार व्हॉट्सअॅपला नोटीस पाठवणार

WhatsApp spam calls

सायबर गुन्ह्याचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअपवरुन बनावट कॉल्स येण्याचे प्रमाण वाढले आहे. कॉल उचलण्यााधीच कट होत आहे. मात्र, हे कॉल फसवणूक करण्याच्या उद्देशाने येत असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दखल घेतली आहे.

WhatsApp spam calls: सायबर गुन्ह्याचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअपवरुन बनावट कॉल्स येण्याचे प्रमाण वाढले आहे. कॉल उचलण्यााधीच कट होत आहे. मात्र, हे कॉल फसवणूक करण्याच्या उद्देशाने येत असल्याचे बोलले जात आहे. अनेक नागरिकांनी व्हॉट्सअपकडे यासंबंधित तक्रार केली आहे. दरम्यान, आता केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. व्हॉट्सअपला नोटीस पाठवणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे.

नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कंपन्यांची

नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येईल तेव्हा सरकार हस्तक्षेप करेल. नागरिकांच्या डिजिटल सुरक्षेची जबाबदारी सेवा पुरवठादार कंपनीवर असते, त्यामुळे सरकार व्हॉट्सअपला नोटीस पाठवणार आहे. या नोटीसीद्वारे बनावट कॉल्स संबंधित माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करेल, राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले. 

नोटीसीतून काय प्रश्न विचारणार?

सायबर गुन्हेगारांना नागरिकांचे मोबाइल क्रमांक कोठून मिळाले? हे कॉल्स व्यक्तीकडून येत आहेत की कृत्रिम बॉट्सद्वारे करण्यात येत आहेत. नागरिकांचे मोबाइल डेटाबेसची चोरी झाली का? असे प्रश्न IT मंत्रालय नोटीसीद्वारे व्हॉट्सअॅपला विचारणार आहे.

परदेशातून भारतीय नागरिकांना कॉल्स

इंडोनेशिया (+62), व्हिएतनाम (+84), मलेशिया (+60), केनिया (+254), इथिओपिया (+251) सह इतर अनेक देशातील क्रमांकावरुन बनावट कॉल्स येत आहेत. फोन उचलण्याआधीच कॉल कट होत आहेत. बऱ्याच वेळा अज्ञात नंबरवरुन काही लिंकही पाठवल्या जात आहेत. या लिंकवर क्लिक केल्यास फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी असे कोणतेही कॉल्स उचलू नयेत, तसेच मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नये. त्यामुळे आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्याचे सरकारी सायबर सेल यंत्रणांनी म्हटले आहे.

बनावट कॉल आल्यास काय कराल? 

1)व्हॉट्सअपवर तुम्हाला जर परदेशातून कॉल आला तर तो क्रमांक ब्लॉक करा. 
2)या क्रमांकाची तक्रार व्हॉट्सअपला करा. रिपोर्ट नंबर असा पर्याय तुम्हाला दिसेल. 
3)तसेच जर सतत कॉल्स किंवा मेसेजेस येत असतील तर सायबर सेलला ऑनलाइन तक्रार करू शकता. 
4)मोबाइलवर आलेल्या अज्ञात मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नका.

व्हॉट्सअॅपद्वारे माइकचा गैरवापर होतोय का?

व्हॉट्सअॅप वापरत नसतानाही मोबाइलच्या माइकचा अॅक्सेस घेण्यात येतो, असा आरोप अनेक नागरिकांनी केला आहे. मात्र, व्हॉट्सअपने हा आरोप फेटाळून लावला आहे. माइकचा अॅक्सेस द्यायचा की नाही, हे सेटिंग्जद्वारे वापरकर्ते ठरवू शकतात. अँड्रॉइड सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा प्रॉब्लेम उभा राहिल्याचा अंदाज व्हॉट्सअपने वर्तवला आहे. तसेच गुगलसोबत मिळून बनावट कॉल्सचा इश्यू सोडवत असल्याचे सांगितले.