पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्लीत नवीन संसद भवनाचे अनावरण केले. यावेळी नव्या संसद भवनात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राजदंड (सेंगोल) स्थापन करण्यात आला.सोन्याचा मुलामा दिलेला आणि चांदीमध्ये तयार करण्यात आलेला राजदंड नव्या संसदेत लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ स्थापन करण्यात आला आहे.
1947 साली भारताला स्वातंत्र्य प्रतिकात्मक सत्ता हस्तांतर करताना लॉर्ड माउंटबॅटन यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्याकडे सेंगोल सोपवला होता. थिरुवावदुराई अधिनम् मठाच्या मागणीवरुन हा सेंगोल तयार करण्यात आला होता. तेव्हा चेन्नईतील वुम्मिदी बंगारु यांनी तो घडवला होता. आता 75 वर्षानंतर पुन्हा एकदा याच कुटुंबाने नवीन सेंगोल तयार केला आहे.
सेंगोलची लांबी पाच फूट असून वजन 1.5 किलो इतके आहे. चांदीमध्ये तयार करण्यात आलेल्या सेंगोलला सोन्याला मुलामा दिलेला आहेत. सेंगोलवर नंदी आसनस्थ असून त्याखाली बारिक नक्षीकाम आहे. न्यायाचे आणि शक्तीचे प्रतिक म्हणून नंदी राजदंडावर विराजमान आहे.
थिरुवावदुराई अधिनम् मठाने या सेंगोलची रचना तयार केली असून त्याला वुम्मिदी बंगारु ज्वेलर्स यांनी घडवले आहे. याबाबत नेमका किती खर्च आला ही माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे. मात्र 1.5 किलो शुद्ध चांदी आणि त्यावर सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. चांदीसाठी जवळपास दिड ते दोन लाख रुपये खर्च आला असेल. त्यावर सोन्याचा मुलामा असल्याने या नव्या सेंगोलचा खर्च जवळपास 10 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.
नवीन संसद भवनात स्थापन करण्यात आलेल्या सेंगोलसाठी किमान डझनभर ज्वेलर्स काम करत होते. साधारण एक महिना हा सेंगोल तयार करण्यासाठी लागला.वुम्मिदी बंगारु ज्वेलर्स या तामिळनाडुमधील प्रसिद्ध सराफाकडून सेंगोल तयार करण्यात आला आहे. सेंगोल तयार करणारी वुम्मिदी यांची पाचवी पिढी आहे.
1947 साली तयार केलेल्या सेंगोलसाठी सुमारे 15000 रुपये इतका खर्च आल्याचे या कुटुंबातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आणि स्वातंत्र्य भारतावेळी तयार केलेल्या सेंगोचे साक्षीदार वुम्मिदी सुधाकर सांगतात. आज ते 96 वर्षांचे आहेत. वुम्मिदी एथिराजुलु साधारण 20 वर्षांचे होते जेव्हा यांनी त्यांच्या भावासोबत मिळून थिरुवावदुराई अधिनम् मठाच्या मागणीवरून 15 ऑगस्ट 1947 साठी सेंगोल बनवले होते.
राजदंड किंवा सेंगोलची निर्मिती करणारे प्रसिद्ध ज्वेलर्स म्हणून वुम्मिदी बंगारु ज्वेलर्स यांची ओळख आहे. दक्षिण भारतावर चौल राजांची सत्ता होती. कोणताही नवीन निर्णय घेताना राजे राजदंडाच्या माध्यमातून अंमलात आणायचे. राज्याभिषेक करताना राजांकडे राजदंड सोपवला जात होता. त्यामुळे त्यावेळी राजदंडाला विशेष महत्व होते. वुम्मिदी बंगारु ज्वेलर्स यांनी आतापर्यंत अनेक राजदंड तयार केले आहेत.