Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EPFO E-Nomination: PF काढताना नाॅमिनेशन गरजेचे आहे का? काय आहे नियम?

EPFO E-Nomination: PF काढताना नाॅमिनेशन गरजेचे आहे का? काय आहे नियम?

Image Source : www.indiatvnews.com

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत (Employee Provident Fund Organisation) पैसे गुंतवणे सुरक्षित मानले जाते. तसेच, EPFO चा कारभार केंद्र सरकारच्या देखरेखीखाली चालत असल्यामुळे, व्याजदरही जास्त मिळण्यास मदत होते. त्यामुळे EPF मध्ये गुंतवणूक वाढली आहे. पण, महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला जर PF मधून पैसे काढायचे असल्यास, त्यासाठी नाॅमिनेशन गरजेचे आहे का? याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

EPFO E-Nomination: EPFO मध्ये गुंतवणूक करणे रिटायरमेंटच्या दृष्टीने चांगला निर्णय ठरु शकतो. काही दिवसांपू्वीच EPFO ने सदस्यांची संख्या वाढली असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करणे सुरक्षित तर आहेच. शिवाय पैसे मिळण्याची हमी देखील आहे. आर्थिक वर्ष 2022-23 साठी EPF च्या ठेवींवर सध्याचा व्याजदर  8.15 टक्के आहे. 

या योजनेमुळे गुंतवणुकदाराला रिटायरमेंटनंतर आर्थिक मदत होऊ शकते. तसेच खातेदाराचे अकाली निधन झाल्यास, त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात मिळू शकतो. पण, त्यासाठी PF खातेदाराने आपल्या कुटुंबातील सदस्याना नाॅमिनी म्हणून नियुक्त करणे गरजेचे आहे. नाहीतर पैसे काढताना त्यांना अडचणी येऊ शकतात. याशिवाय खातेदाराला पैसे काढायचे असल्यास, महत्त्वाच्या कामासाठी तो पैसे काढू शकतो.  

EPFO मध्ये नाॅमिनेशन गरजेचे आहे का?

यंदा सुरुवातीलाच EPFO ने खातेदारांसाठी नाॅमिनीची निवड करणे अनिवार्य केले आहे. या प्रक्रियेसाठी कोणतीही डेडलाईन ठरवण्यात आली नाही. मात्र, संस्थेने या साठी एक उपक्रम सुरू केला आहे. ज्यामुळे खातेदारांना नाॅमिनी जोडण्याची प्रक्रिया सोपी होण्यास मदत होणार आहे. तसेच, विना नाॅमिनेशन खातेदामहत्त्वाच्याया कामासाठी ठरलेल्या नियमानुसार PF मधून पैसे काढू शकतो.  

EPF खात्यात नॉमिनी कसे जोडावे?

ई-नॉमिनेशनद्वारे तुम्ही EPF खात्यात नॉमिनी जोडू शकता. EPFO ने यासाठी नियम ठरवून दिला असून,  फक्त आधार-प्रमाणित UAN धारक ई-नॉमिनेशन करु शकणार आहेत.

  • epfindia.gov.in च्या अधिकृत वेबसाईटवर जा तुमच्या UAN आणि पासवर्डसह लाॅग इन करा.
  • यानंतर 'Manage' सेक्शनवर क्लिक करा आणि 'E-Nomination'वर क्लिक करा.
  • 'Having Family' पर्यायासमोर 'Yes' टिक करा आणि  कुटुंबातील सदस्यांचे डिटेल्स जसे की आधार, नाव, जन्मतारीख, लिंग, नातेसंबंध आणि बँकेचे डिटेल्स जोडा.
  • 'Add Family Details' या पर्यायावर क्लिक करून तुम्ही अन्य सदस्यांनाही जोडू शकता.
  • त्यानंतर 'Save EPF Nomination' निवडा आणि तुमच्या अर्जावर ई-स्वाक्षरी करा. त्यानुसार विनंती सबमिट केली जाईल.

नाॅमिनी नसल्यास काय?

EPFO मध्ये खातेदार कुटुंबातील कोणालाही नाॅमिनी करु शकतो. जर एखाद्याचा परिवार नसल्यास, अशा वेळी तो अन्य व्यक्तीला नाॅमिनी करु शकतो. मात्र, कुटुंबातील सदस्य असल्याचे माहिती झाल्यास, त्या व्यक्तीचे नाॅमिनेशन रद्द होईल. याचबरोबर, एखाद्याने नाॅमिनीची माहिती अपडेट केली नाही आणि त्याचा मृत्यू झाला तर कुटुंबातील सदस्यांना पैसे काढताना खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नॉमिनी कोणालाच केले नसल्यास शक्य तितक्या लवकर ते काम करुन घ्या.