Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

iQOO Neo 7 Pro Launched in India: भारतात iQOO कंपनीचा 'Neo 7 Pro' स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

iQOO Neo 7 Pro Launched In India

iQOO Neo 7 Pro Launched in India: 'iQOO' कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतात नुकताच लॉन्च केला आहे. 'iQOO Neo 7 Pro' असे या स्मार्टफोनचे नाव आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना दोन स्टोरेज ऑप्शन देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची किंमत काय? बुकिंग कधीपासून करता येईल? ऑफर्स काय आहेत, याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

भारतात सध्या अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन विक्रीसाठी पाहायला मिळत आहेत. सॅमसंग (Samsung), नोकिया (Nokia), ॲपल (Apple), रेडमी (Redmi), ओपो (Oppo), वोवो (Vivo) यांसोबतच आता iQOO कंपनी देखील लोकांच्या चांगलीच परिचयाची झाली आहे. या कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतात नुकताच लॉन्च केला आहे. या नवीन स्मार्टफोनचे नाव 'iQOO Neo 7 Pro' आहे. या फोनमध्ये कंपनीने अनेक नवनवीन फीचर्स दिले आहेत. त्यासोबतच हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरवर आधारित आहे. iQOO Neo 7 Pro स्मार्टफोनमध्ये कोणकोणते फीचर्स ग्राहकांना मिळणार आहेत आणि त्याची किंमत किती, जाणून घेऊयात.

'iQOO Neo 7 Pro' च्या फीचर्सबद्दल जाणून घ्या

iQOO Neo 7 Pro हा फोन Android 13 वर आधारित असून कंपनीच्या कस्टम यूजर इंटरफेस ओरिजन ओएसवर चालतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 50MP प्रायमरी कॅमेरा सेंसर आणि 2MP मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा कंपनीने दिला आहे.

iQOO Neo 7 Pro या स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच याचा अस्पेक्ट रेशो 20:9 आणि 120Hz चा रिफ्रेश दर देण्यात आला आहे. हा फोन HDR10+ सपोर्टसह येतो.

iQOO च्या या नवीन स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच ग्राफिक्स सपोर्टसाठी Adreno 730 GPU सपोर्ट मिळणार आहे. हा फोन LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 स्टोरेजसह मिळणार आहे.

iQOO Neo 7 Pro फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे, जो चार्ज करण्यासाठी 120W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हा फोन दोन वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. फियरलेस फ्लेम ऑरेंज (Fearless Flame Orange) आणि डार्क स्टॉर्म ब्लू (Dark Storm Blue) असे दोन पर्याय ग्राहकांना मिळणार आहेत.

किंमत जाणून घ्या

iQOO Neo 7 Pro हा स्मार्टफोन कंपनीने दोन स्टोरेज पर्यायासह लॉन्च केला आहे.  8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसाठी ग्राहकांना 31,999 रुपये मोजावे लागतील, तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसाठी 34,999 रुपये मोजावे लागणार आहेत.

ऑफर जाणून घ्या

'iQOO Neo 7 Pro' फोनची विक्री 15 जुलैपासून ऑनलाईन रिटेल वेबसाईट Amazon आणि iQOO च्या अधिकृत वेबसाईटवर करण्यात येणार आहे. 15 जुलै ते 18 जुलैपर्यंत iQOO Neo 7 Pro फोनच्या खरेदीवर ग्राहकांना 1000 रुपयांची सूट देण्यात येत आहेत. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास 2000 रुपयांची सूट मिळणार आहे.

Source: jagran.com