रिअल इस्टेट कंपनी (Real Estate Company) सुरज इस्टेट डेव्हलपर्सने भारतीय सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) इनिशिअल पब्लिक ऑफरिंगसाठी (Initial Public Offering) पेपर्स दाखल केले आहेत. कंपनीने या IPO च्या माध्यमातून 400 कोटी जमा करण्याचा उद्देश ठेवला आहे. याआधी मार्च 2022 मध्ये कंपनीने IPO साठी SEBI कडे पेपर्स दाखल केले होते.
400 कोटींचे शेअर करणार जारी
कंपनीने आयपीओसाठीचे नवे पेपर्स 24 जुलै रोजी दाखल केले आहेत. याद्वारे कंपनी 400 कोटी रुपयांचे नवीन शेअर जारी करणार आहे. यामध्ये ऑफर फॉर सेलचा (OFS) कोणताही प्रस्ताव दाखल केलेला नाही. कंपनी तिला मिळणाऱ्या पैशातून त्यांच्यावर असलेलं कर्ज फेडणार आहे. तसेच, त्या पैशातून नवीन जागा घेणार आहे आणि जागेचा विकास करणार आहे.
कंपनी आहे नफ्यात!
तब्बल छत्तीस वर्षांपासून मुंबईतील रिअल इस्टेट मार्केटमध्ये सुरज इस्टेट डेव्हलपर्स त्यांचा पाय खंबीरपणे रोवून उभे आहेत. एवढेच नाहीतर त्यांचा पूर्ण दक्षिण मध्य मुंबईत रेसिडेन्टल आणि कमर्शिअल मालमत्ता विकसित करण्यात मोलाचा वाटा आहे. Anarock च्या अहवालानुसार, सप्लायनुसार (युनिट्सच्या संख्येत) ते पहिल्या दहा डेव्हलपर्समध्ये येतात. कंपनी व्हॅल्यू लक्झरी आणि लक्झरी सेगमेंटच्या सुविधा पुरवते. तसेच, 1 कोटी ते 13 कोटीपर्यंतच्या विविध मालमत्ता ग्राहकांसाठी सादर करते. कंपनीने मागील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 32 कोटीचा नफा कमवला आहे. याचबरोबर आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 26.50 कोटी नफा कंपनीला झाला होता.
कंपनीने सारस्वत सहकारी बँक लिमिटेड (प्रभादेवी) आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (दादर) या संस्थात्मक ग्राहकांना बिल्ट-टू-सूट कॉर्पोरेट मुख्यालये बांधून विकली आहेत. तसेच, कंपनी तिच्या वाढत्या मागणीनुसार छोटे कार्यालय उघडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या कंपनीत पैसा गुंतवायचा विचार करत असल्यास, कंपनीच्या अपडेटकडे लक्ष असणं महत्वाचं आहे.