Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सिल्व्हर पर्ल कंपनीचा आयपीओ खुला; 17 जून रोजी होणार लिस्टिंग

सिल्व्हर पर्ल कंपनीचा आयपीओ खुला; 17 जून रोजी होणार लिस्टिंग

IPO Investment 2022 : सिल्व्हर पर्ल हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड लक्झरी स्पेसेस लिमिटेड कंपनीने आयपीओ बाजारात आणला असून 9 जून पर्यंत गुंतवणूकदारांना सबस्क्र्पिशन करता येणार आहे.

सिल्व्हर पर्ल हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड लक्झरी स्पेसेस लिमिटेड कंपनी हॉस्पिटॅलिटी उद्योग क्षेत्रात इकॉनॉमी हॉटेल्सच्या रेंजमध्ये कार्यरत आहे. कंपनीने गोव्यात हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी, तिथे मालमत्ता खरेदीसाठी आणि एकूम व्यावसायिक उद्देशांसाठी 6 जून रोजी आयपीओ (Initial Public Offering - IPO) ओपन केला आहे. हा 9 जून पर्यंत खुला असणार आहे. सिल्व्हर पर्लच्या व्यावसायात उच्च मध्यम, मध्यम आणि इकॉनॉमी हॉटेल्सचा समावेश आहे. सिल्व्हर पर्ल हॉस्पिटॅलिटीची सध्या रकछम, किन्नौर आणि हिमाचल प्रदेशात इथे मालमत्ता आहे. सिल्व्हर पर्ल हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड लक्झरी स्पेसेस लिमिटेड कंपनी ‘ओसिया’ या ब्रँड नावाने हॉटेल, कॅफे आणि रेस्टॉरंट चालवते.

कंपनी स्वत: मालमत्ता विकत घेऊन किंवा जागा दीर्घकालीन लीजवर घेऊन किंवा व्यावसायिक करार करून त्यावर हॉटेल उभारण्याचे कंपनीचे व्यवसायिक मॉडेल आहे. सिल्व्हर पर्ल कंपनी अत्यंत स्पर्धात्मक उद्योगात कार्यरत असून, कंपनीला चांगला बिझनेस करता आला नाही किंवा इतर व्यावसायिक प्रतिस्पर्धी कंपन्यांशी स्पर्धा करू शकली नाही तर कंपनीच्या महसुलात आणि नफ्याला हानी पोहोचू शकते. तसेच सदर कंपनीचं अस्तित्व प्रामुख्याने रकछम, किन्नौर या भागातच आहे. त्यामुळे इथल्या व्यवसायात काही अडचणी आल्यास त्याचा परिणाम संपूर्ण  उद्योगावर होऊ शकतो.

कंपनीला गोव्यात हॉटेलसाठी मालमत्ता खरेदी करायची आहे. तसेच तर कॉर्पोरेट कंपन्यांनुसार सिल्व्हर पर्ल कंपनीचे आयपीओ आणण्यामागे काही व्यावसायिक उद्देश आहेत. कंपनीला मार्च 2022 मध्ये 11.72 लाखांचा फायदा झाला होता. तर मार्च-20 आणि मार्च-21 मध्ये अनुक्रमे 0.47 लाख आणि 3.3 लाख होता. मार्च 2020 मध्ये कंपनीच्या एकूण मालमत्तेची किंमत 211.06 लाख रूपये होती. त्यात मार्च 2022 मध्ये वाढून होऊन ती 459 लाख झाली आहे.

सिल्व्हर पर्ल आयपीओ तपशील

सिल्व्हर पर्ल हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड लक्झरी स्पेसेस लिमिटेड कंपनीचा आयपीओ 6 जून रोजी ओपन झाला असून 9 जूनपर्यंत खुला असणार आहे. कंपनीने एकूण 50 हजार शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध केले असून याचा एकूण व्हॉल्यूम 9 कोटी रूपये इतका आहे. प्रति शेअर्सची किंमत 18 रूपये आहे. यासाठी किमान आणि कमाल 1 लॉट साईज देण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 8 हजार शेअर्स असून यासाठी 1 लाख 44 हजार रूपये गुंतवावे लागणार आहेत. याचे लिस्टिंग 17 जून रोजी होणार आहे.

IPO म्हणजे काय  (Initial Public Offering)

निधी उभारण्यासाठी आयपीओ प्रक्रिया कंपन्यांना फायदेशीर असतं. शिवाय यात पारदर्शकताही अधिक असते. शेअर बाजारात नोंदणी नसलेली म्हणजेच असूचीबद्ध कंपनी जेव्हा ती प्रथमच लोकांसाठी सिक्युरिटीज किंवा शेअरच्या विक्रीद्वारे निधी उभारण्याचा निर्णय घेते तेव्हा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (Initial Public Offering  - IPO) जाहीर करते. स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यानंतर, कंपनी सार्वजनिकरित्या व्यापार करणारी कंपनी बनते आणि कंपनीचे शेअर्स खुल्या बाजारात मुक्तपणे व्यवहार करता येतात.

सध्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण दिसत आहे. एलआयसीच्या शेअर्मसध्ये महिन्याभरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व गोष्टींची माहिती घ्यावी व सेबी नोंदणीकृत असलेल्या अधिकृत सल्लागारांची मदत घेऊन त्यात गुंतवणूक करावी.