Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Upcoming IPOs: या आठवड्यात येत आहेत 4 कंपन्यांचे आयपीओ, कशी कराल कमाई? वाचा...

Upcoming IPOs: या आठवड्यात येत आहेत 4 कंपन्यांचे आयपीओ, कशी कराल कमाई? वाचा...

Upcoming IPOs: बंपर कमाईची संधी या आठवड्यात असणार आहे. कारण 4 कंपन्यांचे आयपीओ बाजारात येत आहेत. शेअर बाजार सध्या त्याच्या लाइफ टाइम शिखराच्या अगदी जवळ आहे. शुक्रवारी शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर असतानाच बंद झाला. या तेजीचा फायदा काही कंपन्यांना होणार आहे.

शेअर बाजार (Share market) तेजीत आहे. या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी (Nifty) आतापर्यंतचा उच्चांकी आकडा गाठतील, असा अंदाज बांधला जात आहे. या तेजीचा फायदा घेण्यासाठी 4-4 कंपन्या या आठवड्यात बाजारात पदार्पण करणार आहेत. या आठवड्यात आत्मज हेल्थकेअर, एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज, व्हीफिन सोल्युशन्स आणि एसेन स्पेशालिटी फिल्म्स हे आयपीओ (Initial Public Offering) ओपन होत आहेत. टीव्ही 9नं याविषयी वृत्त दिलं आहे. या आयपीओंविषयी सविस्तर माहिती पाहू...

आत्मज हेल्थकेअर (Aatmaj Healthcare IPO)

आत्मज हेल्थकेअर ही मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल चालवणारी फर्म आहे. आत्माज हेल्थकेअर 19 जून रोजी आपला आयपीओ लॉन्च करेल. इश्यूच्या माध्यमातून 38.40 कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. ऑफर 21 जून रोजी बंद होईल आणि 30 जून रोजी एनएसईवर लिस्ट होईल. 60 रुपये प्रति शेअर या दरानं 64 लाख शेअर्स जारी करून एकूण इश्यू साइज 38.40 कोटी आहे.

शेअर्सचं दर्शनी मूल्य 5 रुपये आहे. हा फंड कर्जाची परतफेड, अधिग्रहण आणि इतर कारणांसाठी वापरला जाणार आहे. सामान्य कॉर्पोरेट खर्चाव्यतिरिक्त, कंपनी वैद्यकीय उपकरणंदेखील खरेदी करणार आहे. तसंच सार्वजनिक इश्यूच्या पैशातून खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करणार आहे.

एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड (HMA Agro Industries IPO)

एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज 20 जूनला आपला आयपीओ आणणार आहे. प्रायमरी मार्केटमधून 480 कोटी रुपये उभारण्याचं कंपनीचं टार्गेट आहे. कंपनीनं इश्यूसाठी प्रति शेअर 555-585 रुपये किंमत बँड निश्चित केला आहे. 480 कोटी रुपये एचएमए अ‍ॅग्रो आयपीओमध्ये 150 कोटी रुपये किंमतीचे शेअर्स आणि 330 कोटी रुपयांचे ओएफएस यांचा समावेश आहे.

पब्लिक इश्यूसाठी अँकरची बोली 19 जूनपासून सुरू होईल. कंपनी सामान्य कॉर्पोरेट उद्देशांव्यतिरिक्त खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या निधीचा वापर करणार आहे. ऑफर 23 जून रोजी बंद होणार आहे. बीएसई आणि एनएसईवर 4 जुलै रोजी आयपीओ लिस्ट होईल.

व्हीफिन सोल्यूशन्स (Veefin Solutions IPO)

व्हीफिन सोल्यूशन्स आपला आयपीओ 22 जूनला लॉन्च करणार आहे. इश्यूमधून 46.73 कोटी रुपये उभारण्याचं कंपनीचं लक्ष्य असणार आहे. 26 जून रोजी तो बंद होणार आहे. ही एक फिक्स्ड प्राइज इश्यू असणार आहे. नव्या शेअर्ससोबत कंपनी 23.37 कोटी रुपयांची ओएफएस आणत आहे. प्रत्येक शेअरची किंमत 82 रुपये ठेवण्यात आली आहे.

एसेन स्पेशालिटी फिल्म्स (Essen Speciality Films IPO)

एसेन स्पेशालिटी फिल्म्स ही एक विशेष प्लास्टिक उत्पादनं बनवणारी कंपनी आहे. 23 जून रोजी कंपनी आपला आयपीओ ओपन करणार आहे. या माध्यमातून 66 कोटी उभारण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. आयपीओ 27 जून रोजी सबस्क्रिप्शनसाठी बंद होईल. त्याची किंमत 101-107 रुपये प्रति शेअर इतकी आहे. 66 कोटी रुपयांच्या या आयपीओमध्ये 46.99 लाख शेअर्सचा नवा इश्यू आणि 15 लाख शेअर्सचा ओएफएस समाविष्ट असणार आहे.