भारतीय क्रिकेट संघातील स्फोटक फलंदाज म्हणून संजू सॅमसनची ओळख आहे. इंडियन प्रीमियर लिगमध्ये महागड्या क्रिकेटपटूंमध्ये संजू सॅमसनचा समावेश होते. एक रिपोर्टनुसार संजू सॅमसनकडे एकूण 10 मिलियन डॉलर्स अर्थात भारतीय चलनात 80 कोटींची मालमत्ता आहे.
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे. मागील काही वर्षात संजू सॅमसनच्या संपत्तीत 40% वाढ झाल्याचे दिसून आले आहे. क्रिकेटबरोबरच संजू सॅमसनला अनेक कंपन्यांनी ब्रॅंड अॅम्बेसेडर केले आहे. त्याशिवाय बीसीसीआयच्या वार्षिक करारात संजू सॅमसनला c श्रेणीत ठेवला आहे. यातून संजू सॅमसनला वर्षाला 1 कोटी इतके मानधन मिळते. त्याशिवाय सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून संजू सॅमसन वार्षिक 14 कोटींची कमाई करतो.
संजू सॅमसन पत्नी चारुलता सॅमसनसह केरळमधील विजींझाम शहरात राहतो. याशिवाय संजू सॅमसनचे बंगळुरु, मुंबई, हैदराबाद या शहरात प्रॉपर्टी आहेत. या प्रॉपर्टीमध्ये संजू सॅमसन याने जवळपास 4 कोटींची गुंतवणूक केली आहे.
संजू सॅमसनने भारतीय संघाकडून फारशी चमकदार कामगिरी केली नाही मात्र त्याने आयपीएलमधून आपली मजबूत दावेदारी सादर केली आहे. 2012 पासून संजू सॅमसन आयपीएल खेळत आहे. यातून आतापर्यंत त्याने 76 कोटींची कमाई केली आहे. आयपीएलच्या 2021 च्या हंगामापासून संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करत आहे.
संजू सॅमसनकडे लक्झुरी कार्सचा ताफा
संजू सॅमसन लक्झुरी कार्सचा चाहता आहे.
संजू सॅमसनकडे लक्झुरी कार्सचा ताफा आहे. यात 1 कोटी 64 लाखांची रेंज रोव्हर स्पोर्ट कार आहे. बीएमडब्ल्यू 5 सिरीज, ऑडी A6 आहे. या मोटारीची किंमत 66 लाख इतकी आहे. मर्सिडिज बेंझ C क्लास ही कार असून याची किंमत 65 लाख रुपये आहे.