Apple iPhone 15 सीरीजचा मोबाईल लवकरच लाँच होणार आहे. त्याआधीच ॲपलने 14 सीरीजच्या मोबाईलच्या किमती कमी केल्या आहेत. मुंबईत आणि दिल्लीत ॲपल स्टोअर सुरु झाल्यापासून भारतात ॲपलची जोरदार विक्री सुरु आहे. 35 हजारांहून कमी किमतीत भारतीय ग्राहकांना iPhone 14 मोबाईल खरेदी करता येणार आहे. चला तर जाणून घेऊया ही ऑफर नेमकी काय आहे?
सुमारे 80 हजारांचा मोबाईल तुम्हाला अर्ध्या किमतीपेक्षा कमी दरात खरेदी करण्याची संधी मिळते आहे. अशी ऑफर ऐकून आयफोनच्या चाहत्यांनी मोबाईल घेण्यासाठी एकच गर्दी केली आहे.
आयफोन 14 ची लॉन्चिंग किंमत 79,900 रुपये इतकी आहे. फ्लिपकार्ट वरून हा मोबाईल 11% सवलतीवर ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या सवलतीनंतर मोबाईलची किंमत 70,999 रुपये इतकी असणार आहे. म्हणजेच 8,901 रुपये कमी होणार आहेत. आता या मोबाईल खरेदीवर इतरही सवलती दिल्या जात आहेत. त्या सवलती देखील जाणून घेऊयात जेणेकरून मोबाईलची किंमत अजून कमी होईल.
फ्लिपकार्टवर दिलेल्या माहितीनुसार वेगवगेळ्या बँक आणि एक्सचेंज ऑफर उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यामुळे फोनच्या किमती अजून कमी होणार आहेत. HDFC चे क्रेडिट कार्ड वापरून जर तुम्ही पेमेंट करत असाल तर तुम्हांला 4 हजार रुपयांची सूट मिळेल. त्यांनतर फोनची किंमत 66,999 रुपये इतकी असेल. थांबा, ऑफर इथेच संपलेली नाही. मोबाईल खरेदीवर आणखी एक ऑफर तुमचे पैसे वाचवू शकते.
एक्सचेंज ऑफर
iPhone 14 वर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. जर तुम्ही तुमचा ॲपल कंपनीचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केलात तर तुम्हाला 33 हजार रुपयांची सूट मिळू शकते. परंतु जर तुमचा मोबाईल फोन सुस्थितीत असेल तरच तुम्हांला या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. जर तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये तुमचा जुना मोबाईल फोन बसली करण्यास यशस्वी ठरलात तर तुम्हांला iPhone 14 हा मोबाईल 33,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.