Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Post Office RD: पोस्टाच्या आवर्ती ठेवीत 5 वर्षासाठी गुंतवणूक केली, तर मॅच्युरिटीवेळी मिळेल 7 लाखांचा परतावा

Post Office RD

Image Source : www.indiatoday.in

Post Office RD: पोस्टातील गुंतवणूक ही अधिक सुरक्षित आणि सर्वाधिक परतावा मिळवून देणारी असते. तुम्हालाही मासिक आधारावर पोस्टामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर आवर्ती ठेव योजना हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. या योजनेत 5 वर्ष गुंतवणूक केल्यानंतर 7 लाखाहून अधिकचा परतावा मिळू शकतो. त्यासाठी मासिक किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल, जाणून घेऊयात.

भारतात गेली कित्येक वर्ष लोक पोस्टातील वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पोस्टाच्या मार्फत सरकार अनेक गुंतवणूक योजना राबवत आहे. ही गुंतवणूक पद्धत अधिक सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणारी आहे. तुम्हालाही मासिक आधारावर पोस्टाच्या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर पोस्टाची 'आवर्ती ठेव योजना'(Post Office Recurring Deposit Scheme) हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. या योजनेतील व्याजदर सध्या सरकारने 0.30 बेसिस पॉईंटने वाढवला आहे.

या योजनेत पूर्वी 6.2% व्याजदर मिळत होता. मात्र सरकारने व्याजदर वाढवल्यानंतर सध्या या योजनेत 6.5% व्याजदर देण्यात येत आहे. नवीन व्याजदर 1 जुलै 2023 पासून लागू झाले आहेत. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही सर्वाधिक परतावा मिळवू शकता. पोस्टाची ही योजना वेगवेगळ्या कालावधीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेत  पाच वर्षासाठी गुंतवणूक करून 7 लाख रुपये परतावा स्वरूपात मिळवता येऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला मासिक किती रक्कम गुंतवावी लागेल,याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गुंतवणूक कालावधी आणि मर्यादा जाणून घ्या

पोस्टाच्या आवर्ती ठेव योजनेचा (Recurring Deposit Scheme) गुंतवणूक कालावधी 1,2,3 आणि 5 वर्षापर्यंत आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला 6.5 टक्के व्याजदर मिळणार आहे. आवर्ती ठेव योजनेतील गुंतवणूक ही सुरक्षित आणि निश्चित परतावा देणारी आहे. या योजनेत देखील गुंतवणूकदार मासिक आधारावर गुंतवणूक करू शकतो. आवर्ती ठेव योजनेत दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक अधिक फायद्याची ठरते.

पोस्टातील आवर्ती ठेव योजनेत (Recurring Deposit Scheme) गुंतवणूकदार किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात. या योजनेत देखील कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.

7 लाख रुपये परतावा कसा मिळेल?

पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजनेच्या (RD) कॅल्क्युलेटरनुसार, जर एखाद्या व्यक्तीने दर महिन्याला 10,000 रुपयांची गुंतवणूक आवर्ती ठेव योजनेत केली आणि ही गुंतवणूक 5 वर्षासाठी करण्यात आली, तर 6.5% व्याजदराच्या हिशोबाने मॅच्युरिटीवेळी गुंतवणूकदाराला 7 लाख 10 हजार रुपयांचा परतावा मिळेल. या योजनेत एकूण गुंतवणूक 6 लाख रुपये करण्यात येईल. तर गुंतवणूकदाराला 1 लाख 10 हजार रुपये निव्वळ व्याज मिळेल.

हप्ता जमा करण्याची तारीख समजून घ्या

तुम्हालाही पोस्टातील आवर्ती ठेव योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिसमध्ये आवर्ती ठेव खाते ओपन करावे लागेल. हे खाते तुम्ही 1 ते 15 तारखेच्या दरम्यान उघडले, तर प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला यामध्ये रक्कम जमा करावी लागेल. 15 तारखेनंतर खाते उघडले गेले, तर महिन्याच्या शेवटी मासिक हप्ता या खात्यात जमा करावा लागेल.

कर सवलतीचा लाभ घेता येईल का?

पोस्टाच्या आवर्ती ठेव योजनेत (RD) गुंतवलेल्या रकमेवर आयकर कायद्यातील 1961 नुसार कलम 80C अंतर्गत वार्षिक 1.5 लाखांच्या गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

Source: hindi.moneycontrol.com