Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Post Office Scheme:दररोज 333 रुपयांची गुंतवणूक केल्यास 10 वर्षानंतर मिळतील 16 लाख! पोस्टाच्या 'या' योजनेबद्दल जाणून घ्या

Post Office Scheme

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसमध्ये नोकरदार आणि मध्यमवर्गासाठी गुंतवणुकीच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास सुरक्षेसह चांगला परतावा देखील मिळतो. पोस्टाची रिकरिंग डिपॉझिट (RD) हा एक गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरला आहे. पोस्ट विभागाच्या अशाच एका योजनेबद्दल आज माहिती घेऊया. ज्यात दररोज 333 रुपयांची गुंतवणूक केल्यास 10 वर्षांनी जवळपास 16 लाख रुपये मिळतील.

पोस्ट ऑफिसमध्ये नोकरदार आणि मध्यमवर्गासाठी गुंतवणुकीच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास सुरक्षेसह चांगला परतावा देखील मिळतो. पोस्टाची रिकरिंग डिपॉझिट (RD) हा एक गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरला आहे. पोस्ट विभागाच्या अशाच एका योजनेबद्दल आज माहिती घेऊया. ज्यात दररोज 333 रुपयांची गुंतवणूक केल्यास 10 वर्षांनी जवळपास 16 लाख रुपये मिळतील.

पोस्ट ऑफिस आरडी खाते उघडणे सोपे अगदी आहे. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही प्रौढ किंवा मुलांसाठी आरडी खाते सुरु करता येते. किमान मासिक ठेव 100 रुपये करून हे खते सुरु केले जाऊ शकते. दर महिन्याला गुंतवणूकदार यात वाढ करु शकतो. पोस्ट ऑफिस या गुंतवणुकीवर 5.8% इतका व्याजदर देते. पोस्टाची गुंतवणूक अल्प बचत योजनांमध्ये ग्राह्य धरली जाते. केंद्र सरकारकडून प्रत्येक तिमाहीला अल्प बचत योजनांचे  व्याजदर जाहीर केले जातात.पोस्ट ऑफिसची ही योजना अनेकांसाठी फायदेशीर ठरत आहे. 

गुंतवणूक कालावधी (Investment Period)

खाते उघडण्याच्या तारखेपासून पाच वर्षे किंवा 60 महिने इतक्या कालावधीसाठी गुंतवणुकीची मर्यादा आहे. खाते  सुरु केल्यानंतर ठेवीदार एका वर्षात त्यांच्या ठेवीतील 50% रक्कम काढू शकतात. याव्यतिरिक्त, खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर, ठेवीदार ठेव रकमेच्या 50%पर्यंत कर्ज घेऊ शकतात.

दहा वर्षांनंतर 16 लाखांचा फंड मिळेल (After 10 Years 16 Lakhs Corpus)

प्रत्येक महिन्याला 10000 रुपये किंवा सध्याच्या 5.8%  व्याजदराने दररोज सुमारे 333 रुपये गुंतवल्यास, गुंतवणूकदारांना दहा वर्षांनंतर सुमारे 16 लाख रुपयांचा एकूण निधी मिळू शकतो. यानुसार दहा वर्षांसाठी एकूण ठेव 12 लाख रुपये इतकी होते आणि अंदाजे परतावा सुमारे 4.26 लाख रुपये इतका मिळतो, परिणामी मॅच्युरिटीनंतर एकूण परतावा रक्कम 16.26 लाख रुपये इतकी असते.

या योजनेची वैशिष्ट्ये (Features of this plan)

1.  पोस्ट ऑफिसच्या या आरडी योजनेअंतर्गत तुम्ही एक किंवा संयुक्त खाते उघडू शकता. संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 3 लोकांची नावे असू शकतात.
2.  हे खाते 10 वर्षांपेक्षा अधिक अल्पवयीन मुलाच्या नावानेही उघडता येते. पालक हे खाते उघडू शकतात. 
3.  RD चा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे, परंतु तुम्ही मॅच्युरिटीपूर्वी अर्ज करून पुढे आणखी 5 वर्षांपर्यंत वाढवू शकता. 

www.dnaindia.com