SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या कर्जदारांना मोठा दिलासा देत, बँकेने कर्जावरील व्याजदरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याचा MCLR दर कायम ठेवण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. एसबीआयच्या या निर्णयामुळे लाखो कर्जधारकांना जास्त टक्कयांनी ईएमआय भरण्याच्या चिंतेतून दिलासा मिळाला आहे. मुख्य म्हणजे रिझर्व्ह बँकेने एप्रिल 2023 मध्ये आपल्या सर्वात अलिकडील चलनविषयक धोरण बैठकीत (Monetary Policy Meeting) रेपो दर 6.50 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) देखील कर्जदारांची किरकोळ किंमत (MCLR) कायम ठेवली.
नवीन SBI MCLR दर
SBI चा एका महिन्याच्या कालावधीसाठी MCLR दर 8.10 टक्के आहे. तीन महिन्यांसाठी MCLR दर 8.10 टक्के आहे. तर, सहा महिन्यांसाठी MCLR दर 8.40 टक्के आणि एक वर्षाच्या कालावधीसाठी MCLR दर 8.50 टक्के आहे. तर, MCLR दोन वर्षांसाठी 8.60 टक्के आणि तीन वर्षांच्या कालावधीसाठी 8.70 टक्के आहे.
MCLR ग्राहकांना होणारे फायदे व नुकसान
MCLR नियमांतर्गत गृहकर्ज हे नियम पाळणे चांगले आहे, कारण त्यामुळे दीर्घ कालावधीसाठी कमी EMI भरावा लागेल . तथापि, वाढत्या व्याजदराची स्थिती काही काळ कायम राहण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे कर्जाचे व्याजदर हळूहळू वाढतील. त्याच वेळी, EBLR व्याजदर कपातीच्या शक्यतेवर वेगाने पुढे जात आहे. अशा परिस्थितीत, कर्जदार ईबीएलआरकडे जाण्याची तयारी करू शकतात.
तथापि, सर्व MCLR कर्जदारांना याचा फायदा होईलच असे नाही. रेपो रेट आणि MCLR कर्जाच्या किमतीवर तुम्ही किती प्रीमियम भरत आहात, यावर ते अवलंबून आहे. जर मार्केटमध्ये तुम्हाला यापेक्षा चांगली ऑफर नसेल, तर MCLR कर्जावर टिकून राहण्याचा सल्ला दिला जातो.