Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Critical illness Plan: गंभीर आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी विमा हवाच; क्रिटिकल इन्शुरन्स प्लॅन समजून घ्या

Critical illness Plan

Critical illness Plan: गंभीर आजारांवरील उपचारावरील खर्च सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर असतो. तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण वयातही गंभीर आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. उतरत्या काळात तर हा धोका जास्त असतो. त्यामुळे क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स ही महत्त्वाची बाब बनली आहे. हा विमा घेताना कोणती काळजी घ्यावी हे या लेखात समजून घ्या.

Critical illness Plan: बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण वयातही गंभीर आजार जडू शकतात. उतरत्या वयात तर हा धोका अधिक असतो. पारंपारिक विमा पॉलिसी सोडून खास गंभीर आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकता. गंभीर आजारांवरील उपचार अत्यंत महागडे असतात. त्यामुळे भविष्यात जर अशा परिस्थितीचा तुम्हाला सामना करावा लागला तर तुम्ही आर्थिक अडचणीत सापडणार नाहीत.

ग्लोबल बर्डन ऑफ डिसिझ रिसर्स संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात 2019 साली 25 लाख व्यक्तींचा हृदयरोग आणि स्ट्रोक आजाराने निधन झाले. सोबतच कर्करोगाने होण्याऱ्या मृत्युंची संख्याही वाढत आहे. 2021 साली कर्करोगाने सुमारे 26 लाख व्यक्तींचा मृत्यू झाला. 2025 मध्ये हे प्रमाण 30 लाखांच्या जवळपास जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व आकडेवारीवरून येत्या काळात गंभीर आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स कव्हर असणे गरजेचे आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील एखाद्या सदस्याला जर गंभीर आजार झाला तर त्याचा खर्च परवडत नाही. आरोग्यावरील खर्चामुळे भारतात दरवर्षी अनेक कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली गेल्याचे अनेक अहवालांतून समोर आले आहे. कर्करोगासारख्या आजारावर लाखो रुपये खर्च होतात. जर गंभीर आजाराचे निदान झाले तर अशा वेळी क्रिटिकल इलनेस पॉलिसी कामाला येईल. याद्वारे तुम्हाला उपचारासाठी निश्चित रक्कम मिळेल. 

क्रिटिकल इलनेस पॉलिसीच का? (Need of critical illness plan) 

क्रिटिकल इलनेस ही “बेनिफिट बेस्ड पॉलिसी” आहे. म्हणजे गंभीर आजाराचे निदान झाल्यानंतर तुम्हाला विमा कंपनीकडून उपचारासाठी एकरकमी पैसे दिले जातील. तुमचा मासिक खर्च, वैद्यकीय खर्च किंवा आजारपणाच्या काळात उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्यास या रकमेचा फायदा तुम्हाला होईल. गंभीर आजार झाल्यानंतर व्यक्ती मानसिकदृष्या खचून जातो. मात्र, जर त्याला आर्थिक आधारही मिळाला तर या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी त्याला मोठी मदत होईल. तसेच आयकर कायद्यातील सेक्शन 80D अंतर्गत या विम्यामधील रकमेवर कर वजावटही मिळवू शकता.

क्रिकिटल इलनेस पॉलिसीमध्ये कोणते आजार कव्हर होतात ( Which disease can be covered in Critical illness policy)

कर्करोग, किडनी फेल्युअर, हृदयरोग, हायपरटेंन्शन, धमन्यांचे आजार, अवयव प्रत्यारोपण, कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी, aorta graft surgery, हर्ट वॉल्व सर्जरी, स्ट्रोक, कोमा, दृष्टी जाणे, अर्धांगवायू या सारखे आजार कव्हर होतात. विविध पॉलिसींनुसार आजारांची यादी आणि त्याबाबतचे नियम वेगवेगळे असू शकतात.

कोणती पॉलिसी निवडावी?

वाढता उपचारांचा खर्च पाहात गंभीर आजारासाठी पुरेसे विमा कवच घ्यावे. सोबतच ज्या पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त आजार कव्हर असतील अशी पॉलिसी तुम्ही खरेदी करावी.  

टर्म इन्शुरन्समधूनही रायडर घेऊ शकता? (Critical illness rider in term Insurance)

क्रिटिकल इलनेसपासून संरक्षण मिळवण्यासाठी वेगळी पॉलिसी घेण्याबरोबरच क्रिटिकल इलनेस रायडरही तुम्ही टर्म इन्शुरन्स बरोबर घेऊ शकता. उतरत्या वयात गंभीर आजार होण्याचा धोका जास्त असतो. अशा वेळी टर्म पॉलिसी बरोबर क्रिकिटल इलनेसचा घेतलेला रायडर कामाला येईल. याचा एक फायदा असा की, आरोग्य विमा पॉलिसीचा प्रिमियम वयानुसार वाढत जातो. मात्र, तुम्ही जर तरुण वयात टर्म इन्शुरन्ससोबत क्रिटिकल इलनेस रायडर घेतला तर तुम्हाला पॉलिसी संपेपर्यंत फिक्स्ड प्रिमियम असेल. म्हणजे तुम्हाला जास्त प्रिमियम द्यावा लागणार नाही. हा सुद्धा एक पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे.