Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Travel Insurance: 1 रुपयांमध्ये 10 लाखांपर्यंतचा विमा, जाणून घ्या सविस्तर

Travel Insurance

Image Source : http://www.myacademyonline.in.com/

Travel Insurance: भारतीय रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा पुरवते. रेल्वे बरोबरच एसटी महामंडळाच्या बसने शालेय सहल नेल्यास त्यावर सुद्धा प्रवास भाड्यात 50 टक्के सूट आणि 1 रुपयात 10 लाखाचा विमा मिळतो. अनेकदा प्रवाशांना यातील अनेक सुविधांची माहिती नसते. विमा संरक्षण ही रेल्वेची अशीच एक योजना आहे.

Travel Insurance: अलीकडच्या काळात विमा हा चर्चेचा विषय आहे. अनेक लोक जीवन विमा घेतात. आर्थिक नियोजनाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.  प्रवासासाठी जीवन विमा देखील घेतला जाऊ शकतो. भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. भारतीय रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा पुरवते. रेल्वे बरोबरच एसटी महामंडळाच्या बसने शालेय सहल नेल्यास त्यावर सुद्धा प्रवास भाड्यात 50 टक्के सूट आणि 1 रुपयात 10 लाखाचा विमा मिळतो. अनेकदा प्रवाशांना यातील अनेक सुविधांची माहिती नसते. विमा संरक्षण ही रेल्वेची अशीच एक योजना आहे. भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना अत्यंत कमी खर्चात प्रवास विमा प्रदान करते. माहितीअभावी अनेकांना त्याचा लाभ घेता येत नाही. 

शालेय सहलीसाठी बसला का देतात प्राधान्य? (Why do they prefer buses for school trips?)

वर्षाच्या अखेरीस आणि सुरवातीला अनेक शालेय सहलीचे आयोजन केले जाते. एक रुपयात 10 लाखांचा विमा त्याचबरोबर  50 टक्के सवलत यामुळे शालेय सहलींसाठी खासगी वाहनांपेक्षा एसटीला अधिक प्राधान्य देण्यात येते. 204 शालेय सहलीतून 44 लाख 77 हजार 519 रुपयांचे उत्पन्न 2019 मध्ये  एसटीला आले होते. डिसेंबर 2022 मध्ये 326 बसच्या शैक्षणिक सहलीतून 93 लाख 22 हजार 823 रुपयांचे उत्पन्न एसटीला मिळाले. 

प्रवास विमा (Travel Insurance)

भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना अतिशय स्वस्त दरात विमा संरक्षण प्रदान करते. तुम्ही अॅप किंवा कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे रेल्वे तिकीट बुक करता तेव्हा प्रवास विमा हा एक पर्याय आहे. रेल्वे तुम्हाला एक रुपये किंवा त्यापेक्षा कमी विम्याची सुविधा देते. तिकिट बुक करताना बहुतेक लोक याची काळजी घेत नाहीत. त्यामुळे या विम्याचा लाभ घेऊ शकत नाही.  रेल्वे तिकीट बुक करताना हे लक्षात ठेवा आणि विमा संरक्षण मिळवा.

बुकिंग करताना काय करावे? (What to do when booking?)

तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक करता तेव्हा तुम्हाला त्या वेळी छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तुम्ही अॅपद्वारे स्लिपर किंवा इतर आरक्षणे करता तेव्हा हा विमा उपलब्ध होतो. तुम्ही रेल्वे तिकीट काउंटरवरून तिकीट बुक केल्यास, फॉर्ममध्ये विमा पर्याय आहे.

किती नुकसान भरपाई मिळू शकते? (How much compensation can be received?)

ट्रेनमधून प्रवास करताना एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी त्याच्या कुटुंबाला 10 लाख रुपये देते. याशिवाय अपघातात प्रवासी अपंग झाल्यास त्याला आर्थिक मदत केली जाते. तसेच, रेल्वे अपघातात एखादा प्रवासी अंशतः अपंग झाल्यास, विमा कंपनी 7 लाख 50 हजार रुपयांची विमा रक्कम देते. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाला 2 लाख रुपयांची मदत.