सध्याच्या काळात वाहन विमा असेन का गरजेचे आहे हे आजूबाजूची परिस्थिती बघून तुम्हांला जाणीव झालीच असेल. देशभरात पावसाने घातलेला धुमाकूळ, भूस्खलन, नैसर्गिक आपत्ती यांमध्ये वाहनाचे होणार नुकसान तुम्ही सगळ्यांनी पहिले असेल. अशा परिस्थिती वाहन विमा असेल तर वाहन मालकाला विमा क्लेम करून आर्थिक नुकसान भरून काढता येते. मात्र वाहन विमा नसेल तर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही देखील तुमच्या कारचा विमा घेण्याचा विचार करत असाल किंवा विमा नूतनीकरण करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आलीये.
बऱ्याच विमा कंपन्या केवळ भारताच्या सीमेत वाहनाला अपघात झाल्यास त्यावर भरपाई देत असतात मात्र आता अशी एक पॉलिसी आली आहे जी तुमच्या वाहनाला परदेशातही काही नुकसान झाल्यास तुम्हांला भरपाई देणार आहेत.
ही आहे खास पॉलिसी
बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सने (Bajaj Allianz General Insurance) नुकतीच नवीन मोटर विमा पॉलिसी सादर केली आहे. त्याचे नाव आहे...वी-पे (V-Pay). कंपनीने त्यांच्या ग्राहकांना दिलेला हा ॲड-ऑन कव्हरचा एक प्रकार आहे. यामध्ये तुमच्या कारला भारताबाहेर बांगलादेश, भूतान, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि मालदीवमध्येही विमा संरक्षण मिळणार आहे. अलीकडच्या काळात आपली कार घेऊन देशोविदेशात फिरण्याची तरुणाईत क्रेझ आहे. भारत आणि आशिया खंडातील शेजारी देशांमध्ये अनेक पर्यटक कारने प्रवास करत असतात. या नव्या ॲड-ऑन कव्हरमुळे कार चालकांना फायदा होणार आहे.
V-Pay ॲड-ऑन कव्हर
मुख्य म्हणजे V-Pay ॲड-ऑन कव्हर ही सुविधा केवळ खासगी कार मालकांसाठी आहे, व्यावसायिक वाहनांसाठी ही सुविधा उपलब्ध नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. तसेच याचा कव्हर कालावधी हा सामान्य सामान्य मोटर विमा पॉलिसी प्रमाणेच असेल असे देखील सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी Bajaj Allianz General Insurance च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. तसेच 18002095858 या टोल फ्री क्रमांकावर देखील कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता.