तुम्हाला बँकेचे कोणतेही व्यवहार करायचे असतील तर कायम खाते क्रमांक (पॅन कार्ड ) आवश्यक आहे. बऱ्याच जणांनी अद्याप पॅनकार्ड काढले नसेल. मात्र काही वेळा अचानक तुम्हाला पॅनकार्डची गरज भासते. परमनंट अकाऊंट नंबर (PAN) हे कोणत्याही आर्थिक व्यवहारात महत्त्वाचे असते. तसेच ते एक प्रकारचे ओळखपत्र आहे. इनकम टॅक्स रिटर्न (ITR) सबमिट करताना पॅन (permanent account number) देखील आवश्यक आहे. आज आपण हे अतिशय महत्त्वाचे पॅन कार्ड तत्काळ कसे प्राप्त करू शकतो, याबाबतची माहिती जाणून घेऊ.
Table of contents [Show]
अर्जंट ई-पॅन -Instant E-pan card
अर्जंट ई-पॅन(E-pan) सेवा अशा सर्व वैयक्तिक करदात्यांना उपलब्ध आहे. हे पॅन कार्ड आयकर विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून प्राप्त करता येते. ज्यांना कायम खाते क्रमांक (पॅन)अद्याप दिलेला नाही. परंतु त्यांच्याकडे आधार क्रमांक आहे. त्यांच्यासाठी ही सेवा अंत्यत फायदेशीर आहे. तसेच ही अतिशय सुलभ आणि पेपरलेस प्रक्रिया आहे. तुम्ही 10 मिनिटांच्या आत ई- पॅन मिळवू शकता. त्याच बरोबर या ऑनलाईन ई पॅन कार्डची वैधता ही फिजिकल पॅन कार्ड इतकीत वैध आहे. तसेच ई पॅनकार्ड सेवा निशुल्क उपलब्ध आहे.
E-Pan साठी काही अटी
- ज्या व्यक्तीचे अद्याप पॅन कार्ड काढलेले नाही, त्यांनाच पॅन कार्ड काढता येईल
- तत्काळ पॅनकार्ड काढण्यासाठी तुमच्याकडे वैध आधार क्रमांक असावा
- तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक केलेला असावा
- आधार कार्ड वरची जन्मतारीख पूर्ण असावी
- पॅनकार्ड काढण्याच्या तारखेपर्यंत अर्जदार व्यक्ती हा अल्पवयीन नसावा.
ई पॅन कार्ड कसे काढायचे? How to Apply For Urgent Pan Card?
तुम्हाला आयकर विभागाकडून तत्काळ पॅन कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या (https://www.incometax.gov.in/iec/foportal/hi) संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अर्जंट पॅन कार्ड काढण्याचा पर्याय दिसेल. तो पर्याय निवडून तुम्ही पॅन कार्डसाठी अॅप्लिकेशन करू शकता. त्यासाठी पुढील स्टेप्सनुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- प्रथम आयकर विभागाच्या वेबसाईटवर जा - https://www.incometax.gov.in/iec/foportal/hi
- त्यानंतर वेबसाईटवर देण्यात आलेल्या तत्काळ ई पॅनच्या टॅब वर क्लिक करा
- या ठिकाणी तुम्हाला नवीन ई-पॅन मिळवा (Get New e-PAN) हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा
- त्यानंतर तुम्हाला एक आधार क्रमांक अपडेट करण्यासाठी एक बॉक्स दिसेल.
- तुमचा केवायसी पूर्ण झालेला 12 अंकी आधार क्रमांक त्यामध्ये टाका
अर्ज करताना खालील गोष्टींचा खात्री करा आणि माहिती भरा
- तुम्हाला कायमस्वरूपी खाते क्रमांक (पॅन) कधीच दिला गेला नाही.
- तुमचा सक्रिय मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला आहे
- तुमची पूर्ण जन्मतारीख (DD-MM-YYYY) आधार कार्डवर उपलब्ध आहे
- परमनंट अकाउंट नंबर (PAN) च्या अर्जाच्या तारखेनुसार तुम्ही अल्पवयीन नाही
- वरील माहिती भरल्यानंतर सबमिट करा आणि पुढे सुरू ठेवा
महत्त्वाची माहिती-
जर तुमचे आधार कार्ड आधीच कोणत्याही पॅनकार्डशी लिंक करण्यात आले असेल तर तिथे तुम्हाला तुम्ही प्रविष्ट केलेला आधार क्रमांक पहिल्यापासूनच पॅनकार्डशी लिंक असल्याचा संदेश दर्शवेल. त्याच प्रमाणे मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर त्याबाबतचा संदेश दर्शवेल.
ओटीपी आणि इतर आवश्यक माहिती
तुम्ही आधार कार्ड आणि इतर माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एका ओ.टी.पी (OTP) क्रमांकाची पडताळणी करावी लागेल. त्यासाठी एक पेज उघडेल. त्या पेजवर देण्यात आलेले नियम वाचून पुढील प्रक्रिया करण्यासाठी तुमची सहमती दर्शवा. त्यासाठी त्या ठिकाणी देण्यात आलेल्या चेक बॉक्सवर क्लिक करा. ओ.टी.पी. पडताळणी करण्याच्या बॉक्समध्ये तुमच्या मोबाइलवर आलेला 6 अंकी ओटीपी टाका. त्यानंतर त्या खालील चेकबॉक्स क्लिक करा
टीप:- OTP फक्त 15 मिनिटांसाठी वैध असेल. तुम्हाला योग्य OTP टाकण्यासाठी 3 प्रयत्न करावे लागतील. स्क्रीनवर प्रदर्शित झालेला OTP एक्सपायरी काउंटडाउन वेळ तुम्हाला OTP कधी संपेल हे कळवतो. OTP पुन्हा पाठवा वर क्लिक केल्यावर, एक नवीन OTP तयार होईल आणि पाठवला जाईल.
ओटीपी पडताळणीनंतर आधार पडताळणी-
पॅनसह नोंदणीकृत तपशीलांसह आधार ई-केवायसी.तपशील प्रदर्शित केले जातात.आधार तपशीलानुसार अपडेट करण्यासाठी संबंधित चेकबॉक्सवर क्लिक करून, आधार ई-केवायसी (E-KYC). करा. त्यानुसार जे तपशील अपडेट करायचे तपशील निवडा आणि सुरू ठेवा वर क्लिक करा. त्यानंतर आवश्यक माहिती भरा. यामध्ये तुम्ही ईमेल आयडी देखील अपडेट करू शकता. या संपूर्ण प्रक्रियेनंतर तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण झाल्याचा संदेश प्राप्त होईल. त्यानंतर तुम्ही तुमचा E-Pan डाऊनलोड करून घेऊ शकता.
पॅन कार्ड कसे डाऊनलोड करायचे? Download Urgent Pan Card
अर्जंट पॅन कार्ड काढण्यासाठी अप्लाय केल्यानंतर. तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाईटला भेट द्या. Instant Pan Card या पर्यायावर क्लिक करा. येथे Download Pan Card या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तिथे पुन्हा तुमचा आधार नंबर टाका. आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी (OTP) तो टाका. सबमिट बटनावर क्लिक करून पॅन कार्ड डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा. तुमचे पॅन कार्ड डाऊनलोड होईल. या पीडीएफसाठी तुमची जन्मतारीख त्याचा पासवर्ड असेल. अशा पद्धतीने तुम्ही अर्जंट पॅन कार्ड डाऊनलोड करू शकता.