• 07 Dec, 2022 08:20

INOX Green Energy Stock Listing: आयनॉक्स ग्रीन एनर्जीची निराशाजनक सुरुवात, IPO तून गुंतवणूकदारांचे नुकसान

Inox Green Energy Services IPO, Inox Green Energy Services Listing , Inox Green Energy Services

Image Source : www.twitter.com

INOX Green Energy Stock Listing : आयनॉक्स विंडची उपकंपनी आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसच्या इनिशिअल पब्लिक ऑफरिंगला (आयपीओ) ऑफरच्या शेवटच्या दिवशी 1.55 पट सब्सक्रिप्शन मिळाले, जे मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 रोजी संपले. या इश्यूला 6.67 कोटीच्या तुलनेत 10.37 कोटी शेअर्ससाठी बोली मिळाली होती. मात्र आज पहिल्याच दिवशी कंपनीच्या शेअरने निराशाजनक सुरुवात केली.

पवन उर्जा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आयनॉक्स ग्रीन एनर्जी कंपनीने आज बुधवारी 23 नोव्हेंबर 2022 रोजी शेअर मार्केटमध्ये प्रवेश केला. आयनॉक्स ग्रीन एनर्जीचा शेअर 8% डिस्काउंटने लिस्ट झाला. आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसच्या शेअरसाठी 65 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला होता. आज बीएसईवर 60.50 रुपयांवर सूचीबद्ध झाला.तो 8.92% ने घसरुन 59.20 पर्यंत खाली आला. एनएसईवर प्रति शेअर 60 रुपयांनी या दराने लिस्टिंग झाली. आयपीओ प्रति शेअर 65 रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत 8 टक्क्यांहून अधिक डिस्काउंट दरावर सूचीबद्ध आहेत.  

IPO साठी प्रती शेअर 61-65 रुपयांचा दर (The Price Band Was Rs.61-65 Per Share)

आयनॉक्स विंडची उपकंपनी आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसच्या इनिशिअल पब्लिक ऑफरिंगला (आयपीओ) ऑफरच्या शेवटच्या दिवशी 1.55 पट सब्सक्रिप्शन मिळाले, जे मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 रोजी संपले. या इश्यूला 6.67 कोटीच्या तुलनेत 10.37 कोटी शेअर्ससाठी बोली मिळाली. आयनॉक्स ग्रीन एनर्जी आयपीओमध्ये त्याचे प्रवर्तक आयनॉक्स विंड यांनी 370 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स जारी करणे आणि 370 कोटी रुपयांच्या इक्विटी स्टॉकची ऑफर-फॉर-सेल (ओएफएस) यांचा समावेश आहे. किंमत बँड प्रति शेअर 61-65 रुपये निश्चित करण्यात आला होता.

अँकर गुंतवणूकदारांनी केली गुंतवणूक (Anchor Investors)

विशेष म्हणजे, कंपनीने सार्वजनिक इश्यूपूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून 3 कोटी रुपये गोळा केले आणि गुंतवणूकदारांना 65 रुपये प्रति शेअर दराने 5.12 कोटी शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला. मॉर्गन स्टॅन्ली एशिया (सिंगापूर) पीटीई, नोमुरा सिंगापूर लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स मॉरिशस प्रायव्हेट लिमिटेड, एचडीएफसी म्युच्युअल फंड (एमएफ), आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एमएफ, आदित्य बिर्ला सन लाइफ एमएफ हे अँकर गुंतवणूकदार आहेत.

या राज्यांमध्ये कंपनीची उपस्थिती (The Company's Presence in These States)

कंपनीने नवीन इश्यूमधून मिळणारी निव्वळ कमाई वापरण्याची योजना आखली आहे ज्याचा वापर कंपनी कर्ज परतफेड करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी करेल. आयनॉक्स ग्रीन विंड फार्म प्रकल्पांसाठी, विशेषत: पवन टर्बाइन जनरेटर आणि पवन फार्मवरील सामान्य पायाभूत सुविधांसाठी दीर्घकालीन ऑपरेशन आणि देखभाल (ओ अँड एम) सेवा प्रदान करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये कंपनीची उपस्थिती आहे.

शेअरचा B ग्रुपमध्ये समावेश (Shares Included in B Group))

बीएसईने एका नोटीसमध्ये म्हटले आहे की, 23 नोव्हेंबर 2022 पासून, आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसच्या इक्विटी शेअर्सची यादी केली जाईल. 'बी' ग्रुपच्या यादीमध्ये एक्सचेंजवरील व्यवहारांसाठी प्रवेश दिला जाईल.