सध्या भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्या सक्रिय आहेत. ज्यामध्ये सॅमसंग (Samsung), नोकिया (Nokia), शाओमी (Xiaomi), विवो (Vivo), ओपो (Oppo) इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे. यासोबतच इनफिनिक्स (Infinix) ही कंपनी देखील स्मार्टफोन निर्माती कंपनी म्हणून उदयाला आली आहे. या कंपनीने नुकताच एक नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या नवीन स्मार्टफोनचे नाव 'Infinix HOT 30 5G' असे आहे.
या स्मार्टफोनचा पहिला सेल आज लाईव्ह होणार आहे. जर तुम्हालाही नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर इन्फिनिक्स हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या स्मार्टफोनच्या विक्रीवर अनेक वेगवेगळ्या ऑफर्स आणि डिस्काउंट उपलब्ध करून देण्यात येत आहे. जर तुम्हीही घरबसल्या ऑनलाईन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या सेलच्या माध्यमातून तुम्ही बंपर डिस्काउंट मिळवू शकता. हा स्मार्टफोन किती रुपयांना खरेदी करता येईल? आणि तो कुठून खरेदी करता येईल? याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
किंमत जाणून घ्या
इनफिनिक्स कंपनीचा नवीन स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये कंपनीने लॉन्च केला आहे. 'Infinix HOT 30 5G' चा पहिला व्हेरिएंट हा 4GB रॅम आणि 128 GB स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. तर दुसरा व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. या फोनच्या किमतीबद्दल जाणून घ्यायचे झाले, तर पहिल्या व्हेरियंटसाठी ग्राहकांना 14,999 रुपये मोजावे लागतील. तर दुसऱ्या व्हेरिएंटसाठी 16,999 रुपये मोजावे लागणार आहेत. हे दोन्ही फोन परवडणाऱ्या किमतीत ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या सेलच्या माध्यमातून ग्राहकांना पहिल्या बेस व्हेरियंटवर 12 टक्क्यांची सूट देण्यात येत आहे. तर टॉप व्हेरियंटवर 20 टक्क्यांची सूट कंपनी देणार आहे. यासोबतच अनेक बँक ऑफर्सचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.
कुठून खरेदी करता येईल?
Infinix HOT 30 5G या स्मार्टफोनचा पहिला सेल आज दुपारी 12 वाजल्यापासून लाईव्ह झाला आहे. हा फोन तुम्ही दोन ठिकाणाहून खरेदी करू शकता. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून या फोनची खरेदी करता येणार आहे. तसेच ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवरून Infinix HOT 30 5G स्मार्टफोन खरेदी करता येईल.
ग्राहकांनी जर फ्लिपकार्टवरून इन्फिनिक्स स्मार्टफोनची खरेदी केली आणि त्याचे पेमेंट सिटी बँकेच्या डेबिट कार्डवरून किंवा ॲक्सिस बँकेच्या डेबिट कार्डवरून केले, तर ग्राहकांना त्वरित 10 टक्क्यांचा डिस्काउंट मिळणार आहे.
Source: jagran.com